गरजाधारीत प्रशिक्षण कार्यक्रम माहितीपत्रक - नोंदणी लिंक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या दिनांक सात ऑक्टोबर 2022 च्या परिपत्रकानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशय ज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी लिंक द्वारे माहिती संकलित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी विषयनिहाय असे ज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यात येणार आहेत यासाठी माहिती संकलन साधनांद्वारे माहिती संकलित करण्यात येणार आहे या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण निर्मिती केली जाणार आहे.
सदर प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची माहिती मागविण्यात येत आहे तरी आपल्या अधिनिस्त जास्तीत जास्त मुख्याध्यापक व शिक्षक यांना.
https://tinyurl.com/teacherassessmentinfo
वरील लिंक वर अथवा सोबत दिलेल्या क्यू आर कोड द्वारे दिनांक १० नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत माहिती भरण्यासाठी आदेशित करण्यात यावे.