✒राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३

Rajan garud
0

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३



महत्वाचे....

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत आपला नवोपक्रम सादर करण्यासाठी अधिकृत लिंकवर जाण्यसाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. 



👉अत्यंत IMP महत्वाची सूचना👈

नवोपक्रम लिंक भरण्यापूर्वी आपण पुढील तयारी करणे आवश्यक आहे. 

१. नवोपक्रम अहवालाची PDF फाईल
२. नवोपक्रम अहवालाची WORD फाईल
३. प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र PDF फाईल
४. स्पर्धकांचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
५. आवश्यकतेनुसार आपल्या व्हिडिओची YOUTUBE लिंक
हे पूर्णतः तयार करूनच आपण लिंक भरायला सुरुवात करावी.

मुदत :- 
    
या लिंकवर दि.०२/११/२०२२ ते दि.२०/११/२०२२ या कालावधीत आपले नवोपक्रम अहवाल सादर करावयाचा आहे. 

स्पर्धे विषयी

राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

  • १. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका
  • २. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
  • ३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
  • ४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल
  • ५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

तसेच ही स्पर्धा पहिल्या टप्प्यात गट १ व ३ यासाठी जिल्हा /DIET व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) स्तरावर घेण्यात येणार आहे.

त्यानुसार सर्व अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी आपल्या गटानुसार https://scertmaha.ac.in/innovation/ या लिंकवर दि.०२/११/२०२२ ते दि.२०/११/२०२२ या कालावधीत आपले नवोपक्रम अहवाल सादर करावेत.


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सविस्तर माहिती मिळविण्यासाठी अधिकृत पत्र  खालील प्रमाणे आहे.  ते वाचा व नवोपक्रम सादरीकरण करा. 

 


  • राज्यस्तरीय नवोपक्रम सादर करण्यासाठी आवश्यक असलेले प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यसाठी इथे क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)