बदली अपडेट - दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी चे जिल्हा अंतर्गत बदलीबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र

Rajan garud
0

 बदली अपडेट - दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजीचे 

 जिल्हाअंतर्गत बदलीबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र



आज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतून शिक्षक संवर्ग सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाने सुधारित धोरण विहित करण्यात आल्यास सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत म्हणजेच बदलीस पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी निव्वळ रिक्त पदांची यादी संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी गोष्टी वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहे.

 दिनांक 21 ऑक्टोबर 2022 च्या पत्रांवर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदलांची कार्यवाही सुरू आहे.

तथापि काही जिल्हा परिषदेमध्ये एकाच यु-डायस क्रमांक असलेल्या काही शाळा विविध माध्यमांच्या असून अशा शाळांमधील शिक्षकांचा रिक्त पदांचा तपशील भरण्यास अडचण येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदांची माहिती माध्यम निहाय भरण्याबाबतची सुविधा ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून अशा शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदांची माहिती ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये माध्यमनिहाय अद्यावत करावी. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी या अगोदरच विलंब झालेला असल्याचे अशाप्रकारे कार्यवाही करण्यास विलंब कटाक्षाने टाळावा.

वरील प्रमाणे निर्देश सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

PDF  डाउनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)