STATE INNOVATION AND RESEARCH FOUNDATION राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा: 2022
▪️ राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२२▪️
🎖 देशभरातील प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना सुवर्णसंधी🎖
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र (सर फाऊंडेशन महाराष्ट्र) आयोजित
राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२२ मध्ये शालेयस्तरावर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना (नवोपक्रमांना) याद्वारे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती या लिंकवर क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये नवोपक्रम सादर करता येईल.
▪️ देशभरातील प्रयोगशील शिक्षक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना सहभागी होण्याची संधी
सूचना:-
नवोपक्रमाचे लेखन पुढील मुद्यांच्याच आधारे केलेले असावे.
मुद्दे:-
1. नवोपक्रमाचे शीर्षक
2. नवोपक्रमाची गरज व महत्त्व
3. नवोपक्रमाची उद्दिष्टे
4. नवोपक्रमाचे नियोजन
5. नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही
6. नवोपक्रमाचे निष्कर्ष / फायदे
7. परिशिष्ट
8. नवोपक्रमाची सद्यस्थिती.
#या अपलोड करावयाच्या pdf फाईलला तुमचे नाव द्या. याची साईज 10 MB पर्यंतच असावी.
(संपूर्ण नवोपक्रम तयार करून त्याची पीडीएफ झाल्यानंतरच आपण वरील लिंकला क्लिक करून ती फाईल सबमिट करायची आहे)
टीप - स्पर्धेची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२२
टीम सर फाऊंडेशन, महाराष्ट्र
www.sirfoundation.in
अधिक माहितीसाठी संपर्क
राजन गरुड :
7875313385
आनंद आनेमवाड :
9890697966
शिल्पा वनमाळी :
9923871279
सतीश सातपुते :
9422471197
शोभा माने :
9421552517
✳✳✳✳✳✳✳✳
🔀 SHARE THIS MSG TO OTHER TEACHERS
आपल्या संबंधित ग्रुपमध्ये शेअर करा..
✳✳✳✳✳✳✳✳
स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी (लक्षपूर्वक वाचा)
- स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जि.प., नगरपालिका, महानगर पालिका इ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ली ते १२वीला अध्यापन करणारे असावेत.
- राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका, बालवाडी शिक्षिका, शिक्षण क्षेत्रात मुक्त काम करणाऱ्या व्यक्ती, डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
स्पर्धेचे नियम:
- स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम नाविन्यपूर्ण असावा.
- सादर करण्यात आलेल्या शोधनिबंध पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा.
- नवोपक्रम सुवाच्च हस्ताक्षरात किंवा युनिकोड मध्ये टंकलिखित केलेला असावा.
- सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा अलीकडील ३ वर्ष कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.
- नवोपक्रम अहवाल लेखन कमीतकमी १००० शब्दांमध्ये (जास्तीत जास्त कितीही) केलेले असावे. फाईल मध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ३ फोटो टाकावेत.
- नवोपक्रम फाईल PDF स्वरूपात जोडावी. PDF फाईल 10 MB पेक्षा जास्त नसावी.
- स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत YOUTUBE वर असलेली लिंक शेअर करण्यासाठी लिंक वर सोय करण्यात आली आहे.
- नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा.
- या स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रती नवोपक्रम रु. ३१० आहे. स्पर्धकांना एकापेक्षा जास्त नवोपक्रम सादर करता येतील. परंतु प्रत्येक नवोपक्रमासाठी स्वतंत्र लिंक व स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
- विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन्स कॉन्फरन्समध्ये आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. पण त्याकॉन्फरन्सचे शुल्क वेगळे आकारले जाईल याची नोंद घ्यावी.
- स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
- स्पर्धा आयोजनाबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- स्पर्धेची अंतिम तारीख: ३०ऑक्टोबर २०२२