उपसरपंच निवडणुकीत कोळी महासंघाचे जिल्ह्यात एकूण ४ उपसरपंच निवडून आले आहेत या ग्रामपंचायती मध्ये

Rajan garud
0


दि.२८/१०/२०२२ रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत कोळी महासंघाचे जिल्ह्यात एकूण ४  उपसरपंच निवडून आले आहेत या ग्रामपंचायती मध्ये

नुकताच दि.१७/१०/२०२२ रोजी लागलेल्या ग्रामपंचायत निकालात कोळी महासंघच्या उमेदवारांना जनतेने स्पष्ट व भरघोस यश दिले आहे

पालघर जिल्ह्यातील एकूण 6 ग्रामपंचायत मध्ये कोळी महासंघ पुरस्कृत सरपंच व सुमारे १८ ग्रामपंचायती मध्ये कोळी महासंघ आणि समाज उन्नती संघटनाने उमेदवार निवडून आणले आहेत!

यात मोखाडा,जव्हार,विक्रमगड, पालघर,डहाणू,तलासरी या तालुक्यातील ग्रामपंचायती आहेत


हे सर्व निवड झालेले व्यक्ती सुशिक्षित,तरुण,गावासाठी काही करू इच्छिणारे राजकीय पार्श्भूमी नसणारे पण समाज कार्याशी व मातीशी नाळ जोडलेले आहेत व पारदर्शक ग्रामपंचायत चालवून गावाचा विकास करतील असा निर्धार संघटनेच्या कार्यकर्त्याचा आहे.


सर्व उमेदवार व सरपंच हे मा.श्री.रमेश दादा पाटील आमदार विधान परिषद, ॲड.श्री.चेतन दादा पाटील युवा प्रदेश अध्यक्ष कोळी महासंघ,प्रदेश अध्यक्ष भाजपा मच्छीमार सेल व श्री.तन्मय साखरे, श्री.रामदास लहारे,सरपंच सुदाम उंबरसाडा, सरपंच श्री देविदास निसाळ,सरपंच श्री हीरामल मवळे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्व मध्ये निवडून आले आहेत तसेच कार्याध्यक्ष श्री धनंजय मेहेर,श्री.गौतम वर्तक,सौ.कोलम जोशी,सौ.पुष्पा पाटील,श्री.सुशील ओगले, श्री.भावेश मनिवडे,श्री.मुरलीधर कडू यांनी मार्गदर्शन व मेहनत घेतली आहे.


ज्या गावात गावकऱ्यांनी गावात बदल घडवण्यासाठी व पक्ष व जाती भेद चे राजकारण दूर करण्यासाठी गावाचे पॅनल उभे केले होते अश्या सर्वांना या संघटनेचा पाठिंबा असेल तसेच  जिल्ह्यातील तरुण पिढी कोळी महासंघ कडे आकर्षित होत आहे असे ही सांगितले!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)