ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका शिक्षकानं या विद्यार्थामधील हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं.
शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्खा महाराष्ट्राला लावलंय वेड, पाहा व्हायरल व्हिडीओ
याला म्हणतात अस्सल टॅलेंट. खूप छान 💐💐 कुठली पार्श्वभूमी नाही की कुठलं संगीताचं शिक्षण नाही. हे उपजत टॅंलेंट माझ्या गावखेड्यातल्या अनेक पोरांकडे आहे. पण त्यांना पुढे यायची संधी मिळत नाही. योग्य व्यासपीठ मिळत नाही. या चिमुकल्याचं नाव जयेश खरे आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात हा शिकतो. अतिशय सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला जयेश गावच्या मातीतला हिरा आहे. हे टॅलेंट जगासमोर आणणाऱ्या कृष्णा राठोड सरांचंही कौतुक.
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यांपैकी काही व्हिडीओ हे इतके मनोरंजक असतात की ते पाहण्यात आपल्या तासनतास वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने अख्ख्या महाराष्ट्राल वेड लावलं आहे.
हा व्हिडीओ एका शाळकरी मुलाचा आहे. ज्याचं गाणं तुमच्या कानावर पडताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. हा मुलगा आपल्या वर्गात गाणं गताना दिसत आहे. हा मुलगा लावणी गात आहे. त्याच्या आवाजात अशी काही जादू आहे की तुम्ही त्याचं गाणं संपूर्ण ऐकण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही.
खरंतर चंद्रा या गाण्यानं आणि अभिनेत्री अमृता खानविलकरच्या गाण्यानं आधीच संपूर्ण महाराट्राला वेड लावलं होतं. त्यात आता या चिमुकल्यानं ज्या पद्धतीने गाणं गायलं आहे, ते देखील तुम्हाला मोहात पाडेल.
मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील मुलाचं नाव जयेश खरे आहे आणि तो नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. कुठली पार्श्वभूमी नाही की कुठलं संगीताचं शिक्षण नाही, तरी देखील या मुलानं जे गायलं त्याला तोड नाही.
शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्खा महाराष्ट्राला लावलंय वेड, पाहा व्हायरल व्हिडीओ#viralvideo #trending #maharastra pic.twitter.com/tT3aKFxOly
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
खरंच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या या मुलाच्या टॅलेंटला मानावं लागेल.
ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका शिक्षकानं या विद्यार्थामधील हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जो लोकांना फारच आवडला.
हा व्हिडीओ काहीच तासाच सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. ज्यावर लोक भरभरुन लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.