निपुण महाराष्ट्र अभियान माता-पालकगट आयडिया व्हिडिओ
सर्व लिडर मातांना नमस्कार 🙏
आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली...याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता 1ली ते 3रीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सूचविले आहेच..परंतु तेवढ्याने मुलं निपुण होणार नाहीत, म्हणून प्रत्येक वाडी-वस्तीवर माता-पालकगट स्थापन केले गेले आहेत... यासाठी पालक म्हणून आपण सुद्धा घरी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आज पासून तुम्हाला आम्ही आयडिया व्हिडिओ पाठवित आहोत. अश्याप्रकारचे
आयडिया व्हिडिओ तुम्हाला दर आठवड्याला मिळतील. दर आठवड्याला येणारे है व्हिडिओ आपल्या गटातील मातांना दाखवा. व्हिडिओमध्ये दाखविलेल्या कृती व अभ्यास, आपल्या गटातील मातांकडून करून घ्या.
ह्या दाखविलेल्या सर्व क्रियाकृती घरी आपल्या मुलांबरोबर माता-पालकांनी घेणे अपेक्षीत आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्याचा त्यांना खुप फायदा होईल. या कार्यात आपण छोट्या छोट्या गटात एकत्र आलो तर एकमेकांना सहायता सुद्धा करु शकू.
चला तर मग आता आपण सुद्धा आपल्या मुलांना निपुण बनविण्यात सक्रिय होऊया.....