एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक ट्रेनिंग वेळापत्रक व लिंक १७/०८/२०२२ मराठी माध्यम ( फक्त आदर्श शाळा )

Rajan garud
0

आता होणार एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक 
ट्रेनिंग वेळापत्रक व लिंक


प्रति,

प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था--- ( सर्व ) शिक्षणाधिकारी ,बृहन्मुंबई शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक )--- जिल्हापरिषद ,(सर्व) शिक्षणनिरीक्षक ,मुंबई (पश्चिम ,दक्षिण व उत्तर ) प्रशासन अधिकारी (मनपा ,नपा ) ---(सर्व) विषय : एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित

राहणेबाबत......

उपरोक्त विषयान्वये, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच ४८८ आदर्श शाळांमधील दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

___ त्या अनुषंगाने राज्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे मार्फत दिनांक १७ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२२ रोजी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.

तरी सदर प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकारी यांना उपरोक्त नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे.

सदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण तपशील आणि यूट्युबची लिंक खालीलप्रमाणे आहे.


इयत्ता : पहिली
मराठी :माध्यम
( फक्त आदर्श शाळा )

१७/०८/२०२२

सकाळी १०.०० ते १२.५०








 एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक  ट्रेनिंग लिंक




एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण - इयत्ता पहिली





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)