जरा डोके चालवा ??? शाब्दिक कोडी उपक्रम word puzzle

Rajan garud
0

 जरा डोके चालवा ???


      विद्यार्थ्यांची कुतूहलता,तार्किक विचार करण्याची शक्ती,चिकित्सक वृत्ती,सामान्य ज्ञान वृद्धी यांचा विकास होताना दिसतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनुसार खेळांतून शिक्षण देण्यासाठी व सहज परिसरातून ज्ञान मिळविण्यासाठी शब्दकोडी उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांची शोधक वृत्ती व जिज्ञासा वृत्ती चा विकास होतो. यांमुळे संशोधक वृत्तीला चालना मिळते. परिसरातील प्रत्येक गोष्टीकडे चिकिस्तक वृत्तीने विद्यार्थी बघू लागतो. भविष्यात शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी प्राथमिक स्तरावर असे शाब्दिक खेळ खेळले पाहिजे. 



१) मारा पाय भरभर धावते मी, सरसर ओळखा पाहु मी कोन?

उत्तर – सायकल

 

२) चप्पल हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली.

उत्तर - भेंडी

 

3.तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी बाकी लोक जास्त वापरतात.

उत्तर - नाव

4.सात अक्षरी ना काना, मात्रा, नी वेलांटी असा जिल्हा कोणता?

उत्तर – अहमदनगर

 

5. अशी कोणती वस्तु आहे जी खाण्यासाठी घेतो पण खात नाही.

उत्तर – ताट

 

6.दोन बैल होते एक मेला एक विकला किती राहिले?

उत्तर - फसवा प्रश्न उत्तर एक किंवा शून्य

 

7.मी सर्व वस्तुंना उलटे करु शकतो,

पण स्वताला मी हलवु ही शकत नाही,

ओळखा पाहु मी कोण?

उत्तर – आरसा

 

8.रोजच असतो तुमच्या घरी मी,पण काही जणानांच आवडतो,

ञास मला देता तुम्ही पण,अश्रुंचा पुर तुमच्याच डोळयात येतो,

ओळखा पाहू मी कोण.

उत्तर - कांदा

9.तो कोण ज्याला आपण दिवसा पाहु शकतो, पण रात्री कधीच पाहु शकत नाही.

उत्तर - सुर्य

 

10.उन्हाळयात तुम्ही मला घाबरता,

पण हिवाळयात मलाच खाता,

पावसाळयात माझ्यामुळे दिसते,

तुम्हाला एक इन्द्रधनुष्य,

ओळखा मी कोण?

उत्तर - ऊन

 

11.दिवसा ढवळया मक्काम करूनी, बाहेर पडतो रातीला,

असा कोणता फिरे प्रवासी, दिवा बांधुन पाठीला.

उत्तर – काजवा

 

12.गळा आहे,पण डोकं नाही,खांदा आहे पण हात नाहीत सांगा मी कोण.

उत्तर - मांडणी/आडणी

 

13.एवढसं कार्ट घर कसं राखतं.

उत्तर - कुलूप

14.दोन भाऊ शेजारी भेटनाही जान्मांतरी.

उत्तर – डोळा

 

15.चार खंडाचा एक शहर,

चार विहरी बिना पानी 18 चोर त्या शहरी,

एक राणी आला एक शिपाई,

सगळ्यांना मारून मारूत विहरीत टाकी !!

सांगा मी कोण?

उत्तर -  कॅरम

 

 

16.आधी लाल लाल मग गोल गोल मग थंयागथताळांग  सांगा मी कोण?

उत्तर - उखळ-ठोंबा मिरच्या

 

17.कपीली गाय तिला लोंखडी पाय, राजा बोंबलत जाय पण थांबत नाय.

उत्तर – रेल्वे

 

18.वेडा नाही पण कागद फाडतो,

पोलिस नाही पण खाकी कपडे घालतो,

देऊळ नाही पण घंटा वाजवतो,

ओळखा मी कोण?

उत्तर -  बस कंडक्टर

19.एकदा का बापाने मुलाल एक वस्तु दिली आणिसांगितले भुक लागली तर खा,

तहान लागली तर पी

आणि थंडी वाजली तर जाळ

सांगा पाहु ती वस्तु कोणती?

उत्तर - नारळ

 

20.अशी कोणती वस्तु आहे की जी ओढल तितकी मोठी होत जाते.

उत्तर - रबर

 

 

21.एक पाच अक्षरी पदार्थ,

पहिले 3 अक्षरे एका फुलाचे नाव,

शेवटचे आणि 4 थे अक्षर मौज, पहिले दुसरे आणि शेवटचे अक्षर नोकर.

उत्तर - गुलाबजाम

 

22.मी तुमच्या शरिराचा एक भाग आहे,

तुम्ही मला तुमच्या डाव्या हातात पकडु शकता,

पण उजव्या हातात नाही, ओळखा पाहु मी कोण?

उत्तर -  उजवा कोपरा

 

23.गावभर हिंडतो पण देवळात जायला घाबरतो, ओळखा पाहु मी कोण?

उत्तर -  चप्पल

 

24.एक जन वाढायला 12 जण जेवायला.

उत्तर - घड्याळ

 

25.मुकुट याच्या डोक्यावर जांभळा झगा अंगावर ,काटे आहेत जरा सांभाळून, चवीने खातात मला भाजून ओळख पाहू मी कोण?

उत्तर - वांगे

 

26.बारीक लांब पण काठी नाही दोन तोंडाची पण गांडूळ नाही श्वास घेतो पण तुम्ही नाय.

उत्तर - बासरी

 

27.मातीशिवाय उगवली कपाशी लाख मन, मुसळधार पावसात पण भिजला नाही एक कण.

उत्तर -  ढग

 

28.दात आहेत पण चावत नाही गुंता होता काळ्या शेतात सगळे सोपवतात माझ्यावर.

उत्तर - कंगवा

29. बस मध्ये 100 लोकं बसली होती पुढच्या थांब्यावर निमी उतरली तर बसमध्ये किती लोक राहिले?

उत्तर - 99

 

30.एक तारेवर 10 पक्षी बसले होते 1 बंदुकीने मारला किती राहिले?

उत्तर -  शून्य

 

31.एक शर्ट वाळायला 1 तास लागतो तर 10 शर्ट वाळायला किती तास लागतील?

उत्तर - 1 तास

32.लाल गाय लाकूड खाय पाणी प्याय मारून जाय.

उत्तर -  आग

 

33.दोन भाऊ जुळे एक रंगाचे एक उंचीचे एक हरवता काय काम दुसऱ्याचे.

उत्तर - चप्पल

 

34.पाय नाही चाक नाही तरीही चालतो खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागत.

उत्तर - पेन

 

35.आठ तोंड जीभ नाही तरी शब्दाची गोडी मधापेक्षा कमी नाही.

उत्तर -  बासरी

 

36.पांढरी जमीन काळे बीज देता ध्यान होऊ सज्ञान.

उत्तर -  पुस्तक

 

37.खडक फोडला चांदी चमकली चांदीच्या विहरीत मिळते पाणी आम्ही म्हणतो देवाजींची हीच करणी.

उत्तर - नारळ

38.रस्ता आहेत पण वाहने नाहीत घरे आहेत पण माणसे नाहीत.

उत्तर - नकाशा

 

39.अशी कोणती गोष्ट आहे जी आजारी पडत नाही तरी गोळी द्यावी लागते?

उत्तर - बंदूक

 

40.एक म्हतार्याला बारा पोरं काही लहान काही मोठी काही तापलेली काही थंड.

उत्तर - वर्ष

 

41.हात लावता गोल होतो शंभर पाय नाव कोणते?

उत्तर - पैसा किडा

 

42.रात्र होता दडून बसतात सकाळ होता सारे हसतात.

उत्तर -  फुले

 

43.जिकडे तिकडे उजेड गाणी सांगा सणांची कोणती राणी.

उत्तर - दिवाळी

 

44.एव्हढं मोठं माझं पोट साठून ठेवतो खबरी खास रोज सकाळी मी येतो सर्वजण पाहती माझी वाट.

उत्तर - वर्तमानपत्र

 

45.पांढरे पातेले पिवळा भात न ओळखेल त्याच्या कंबरेत लाथ.

उत्तर – अंडी

 

46.काळ्या रानात उभी तलवार.

उत्तर - उभे केस

 

 

47.तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला?

उत्तर - लवंग

 

48.सगळे गेले रानात झिपरी पोरगी घरात.

उत्तर - केरसुणी

 

49.आटंगण पटांगण लाल लाल रान आन बत्तीस पिंपळांना एकच पान.

उत्तर - जीभ,दात,तोंड

 

50.काट्या कुट्याचा बांधला भारा कुठे जातो ढबुन्य पोरा.

उत्तर – फणस

 

51.वीज गेली आठवण झाली मोठी असो व लहान डोळयांतून हिच्या गळते पाणी.

उत्तर - मेणबत्ती

 

52.गळा आहे पण डोके नाही खांदा आहे पण हात नाही.

उत्तर -  शर्ट

53.न बोलवताच येतो तुमच्या घरी मी न भाडे देताच दिवस दिवस राहतो पकडू शकत नाही मला जगु सुद्धा शकत नाही माझ्याविना.

उत्तर - हवा

 

54.जागेवरून न हालत एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो कधी मी वाकडा कधी सरळ कधी करडा कधी गरम.

उत्तर - प्रकाश किरण

 

55.सुपभर लाह्या त्यात एक रुपया.

उत्तर - चंद्र आणि चांदणे

 

56.तीन पायांची तिपाई वर बसला शिपाई.

उत्तर - चूल आणि तवा

 

57.पाटील बुवा राम राम दाढी मिशी लांब लांब.

उत्तर - मक्याचे कणीस

 

58.हा एकदा खाल्यानंतर पुन्हा खात नाही.

उत्तर - धोका

 

59.पाने नाही पण हिरवा आहे माकड नाही पण नक्कल करतो.

उत्तर - पोपट

 

60.सगळ्यांच्या जवळ आहे पण कोणी सोडू शकत नाही.

उत्तर - सावली

 

61. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे

उत्तर - जीभ

 

62. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी

उत्तर - फुकणी

 

63. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान

उत्तर - जीभ

 

64. आठ तोंडे,जीभ नाही,गाणे मात्र सुरेल गाई

उत्तर - बासरी

 

65. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय

उत्तर - चप्पल

नका जोडु मला इंजीन, लागत नाही मला इंधन

उत्तर – सायकल

 

नाव एका माणसाचे चार अक्षरी!!

पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव

दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव

तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव

चारही अक्षर मिळून त्याचे नाव

ओळखा पाहू ते नाव काय..??

उत्तर :- सिताराम

मुकुट माझ्या डोक्यावर आहे

जांभळा झगा माझ्या अंगावर आहे

आहेत मला काटे जरा सांभाळून

चविष्ट आहे मी खातात मला भाजून

सांगा पाहू मी आहे तरी कोण ?

उत्तर :- वांगे

 

कोकणातून आली माझी सखी

तिच्या मानेवर दिली मी बुक्की

तिच्या घरभर पसरल्या लेकी

सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :- लसुन

चार बोटे आणि एक अंगठा

तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही

सर्वजण बेजार म्हणतात मला

तरी नेहमी उपयोगी मी राही

सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :- हातमोजे

 

भाऊराया माझा खूप शैतान

बस तू माझ्या नाकावर

पकडून माझे कान

सांगा आहे तरी मी कोण ?

उत्तर :- चष्मा

अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता

किंवा ती तुम्हाला गिळू शकते

सांगा पाहू ती आहे कोणती ?

उत्तर :- अहंकार

 

कोकणातून आलेला एक रंगू कोळी

आणि त्याने एक भिंगु चोळी

शिंपी म्हणतोय मी शिव तरी कशी

धोबी म्हणतोय मी धुवू तरी कशी

राणी म्हणते मी घालू तरी कशी

सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :- कागद

एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला

तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे

उत्तर :- तो पहिल्याच पायरीवर होता

 

कोणता तो चेहरा ?

सकाळपासून संध्याकाळ पर्यंत..

आकाशाकडे पाहत राहतो हसत ?

उत्तर :- सूर्यफूल

 

 

काळ्याभोर रानात एक हत्ती मेला

लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला

सांगा मी कोण ?

उत्तर :- कापूस

 

तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात

तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता

तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण ?

उत्तर :- तुम्ही

 

एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी

नारळाच्या झाडावर जोराने धावत होते

तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील ?

उत्तर :- नारळाच्या झाडावर केळी नसतात.

 

 

माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत

तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही

सांगा मी आहे कोण ?

उत्तर :- कीबोर्ड

 

कोणत्या महिन्यात

लोक सर्वात कमी झोपतात ?

उत्तर :- फेब्रुवारी

 

येथे एक फूल फुलले आहे,

येथे एक फूल फुलले आहे

आम्ही एक विचित्र आश्चर्य पाहिले,

पानांवर पाने.

उत्तर :- फुलकोबी

 

 

माणसासाठी कोणती गोष्ट हानिकारक आहे?

पण लोक अजूनही ते पितात.

उत्तर :- राग

 

दोन बोटांचा रस्ता..

त्यावर चाले रेल्वे..

लोकांसाठी आहे उपयोगाची..

काही सेकंदात आग लावते..

उत्तर :- माचीस काडी (मॅचस्टीक)

 

 

सर्वेशच्या वडिलांना 4 मुले आहेत

1. सुरेश

2. रमेश

3. गणेश

चौथ्याचे नाव सांगा?

उत्तर :- चौथेचे नाव सर्वेश आहे.

 

अशी कोणती गोष्ट आहे,

जी आपण जागी असल्यावर वर जाते

आणि झोपी गेल्यावर खाली येते.

उत्तर :- डोळ्यांच्या पापण्या

बिना चुलही ची खीर बनवली..

गोड नाही नमकीन नाही..

थोडे थोडे खाल्याचे लोक खूप शौकीन.

उत्तर :- चुना

 

एक रहस्य बॉक्स पाहिला,

ज्याला नाही कव्हर

किंवा लॉक केलेला नाही..

खाली किंवा कोपरा बंद केलेला नाही,

त्यामध्ये चांदी आणि सोने आहे. कोण पाहू??

उत्तर :- अंडी

अशी कोणती गोष्ट आहे

पती आपल्या पत्नीला देऊ शकतो?

परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही.

उत्तर :- आडनाव (surname)

 

कोण आहे जो

आपली सर्व कामे

आपल्या नाकाने करतो

उत्तर :- हत्ती

 

 

दोन अक्षरात सामावले माझे नाव

मस्तक झाकणे आपले माझे काम

ओळखा पाहू मी आहे कोण ?

उत्तर :- टोपी

 

प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती

जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही ?

उत्तर :- वय

 

 

दोन गुहेचे आहेत दोन रक्षक

दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर

सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :- मिशा

 

पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते

हात नसूनही मी तुमच्याशी भांडते

सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :- पतंग

 

 

तीन अक्षरांचे माझे नाव

वाचा उलटे किंवा वाचा सरळ

मी आहे प्रवासाचे साधन, सांगा पाहू माझे नाव

उत्तर :- जहाज

 

अशी कोणती गोष्ट आहे

जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही ?

उत्तर :- दूध

 

आपण कोणत्या प्रकारचा

टेबल खाऊ शकतो?

उत्तर :- व्हेजिटेबल

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)