मी तिरंगा बोलतोय मराठी भाषण
“Mi Tiranga Boltoy speech Marathi”
भाषण क्र.1
मी तिरंगा बोलतोय
प्रिय भारतवासीयांनो,
मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. २२ जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.
यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला.
स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला.
भाषण क्र.2
“वरी केशरी मध्ये पांढरा,खाली हिरवा रंग,अशेकचक्रा शोभतो,निळसर रंग”
असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तिरंगा आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय.
आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. भारतीय माझा आदरही करतात. प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य ही घोषणा केली होती.
त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याच बरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदग्रहण केलेले या घटनेची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.
स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान अमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली.
त्यामुळेच १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारी या दोन तारखांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण धारण महत्त्व आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्याचे प्रतीक जो तिरंगा म्हणजे मी आकाशात डौलात डोलावा म्हणून असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची तसेच कुटुंबाची पर्वा न करता देशप्रेमाने झापाटून जाऊन निकराचा लढा दिला.
माझ्यावरील अतीव प्रेमापोटी या लढ्यात सर्वजणांनी तळमळीने स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार कण्यासाठी घरदार, नातेवाईक, माता – पिता, बायको मुले यांना सोडून फक्त स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास घेऊन या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली होती.
स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी तुरुंगवास भोगला, शारीरिक-मानसिक छळाची परिसीमा ज्यांनी सहन केली, माणुसकीला लाजवतील अशा क्रूर व अनन्वित छळ त्यांनी निधड्या छातीने सहन केला, कित्येक स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम् चा घोष केला.
अशा सर्व स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणे हे सर्व भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे. हे सर्व का, तर तिरंगा आकाशात मानाने फडफडावा म्हणून, तिरंग्याकडे म्हणजेच माझ्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये अथवा माझी हेटाळणी करू न…
स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपल्या सर्वस्वाची होळी केली व आपले प्राण स्वतंत्र्यासाठी खर्ची घातले. त्या वीरांना व वीरांगनांना कोटी कोटी प्रणाम! त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्याची गोडी चाखता आली.
आजच्या युवा पिढीच्या खांदयावरच उद्याच्या भारताची भिस्त आहे. या तिरंग्याचे रक्षण करणे व तिरंगा मानाने कसा फडफडत राहील याची काळजी घेण्याचे काम या युवापिढीवरच आहे.
जगभरात भारताला प्रगतिपथावर नेणारे कोण असतील, तर ते आहेत आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे युवक.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यवीरांनी केलेले आत्मबलिदान नक्की स्फूर्ती देणारे आहे, यात शंका नाही. पण, त्याचा गंभीरतेने विचार केला जातो का, हे पाहणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून आपला देह ठेवला. आपले रक्त सांडले त्याचे प्रतीक हा तिरंगी झेंडा आहे. त्याला वंदन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
हेही वाचा.
" हर घर झंडा " उपक्रम स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत राबविण्याबाबत परिपत्रक