जि.प.शाळा कर्दळ या शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष ऑनलाईन EVM मशिनद्वारे
जिल्हा परिषद शाळा कर्दळ केंद्र सफाळे,ही पालघर जिल्ह्यातील तथा तालुक्यातील सफाळे परिसरातील उपक्रमशील शाळा आहे. तेथील शिक्षकही उपक्रमशील व तंत्रस्नेही आहेत. या शाळेतील शिक्षकांनी शनिवार,दिनांक 16 जुलै 2022 रोजी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष EVM द्वारे म्हणजेच EVM यंत्र असलेल्या मोबाईल एप्लिकेशन् द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली.
शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष निवडणुकांच्या धरतीवर नियोजनबद्ध राबविलेल्या या प्रक्रियेत निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा सोमवारी दिनांक 18 तारखेला जाहीरपणे शाळेत शपथविधी होणार आहे.
कर्दळ शाळेत उपक्रमांचा शनिवार म्हणून रंगलेल्या 'शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया 2022' या निवडणुकीची काल पासून धामधूम होती, सर्व उमेदवार आपापल्या चिन्हासह प्रचार कार्यात गुतंले होते.शनिवारी सकाळपासून शाळेत पुन्हा धामधूम होती. मतदान प्रतिनिधी, मतदार अधिकारी, सुरक्षा रक्षक,केंद्राध्यक्ष यांसह मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक प्रशिक्षण अधिकारी, अशा सगळ्यांनी ऑनलाईन ईव्हीएम निवडणुक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे त्या दिवशी शाळेतील उपस्थित एकूण 150 विद्यार्थी मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग नोंदवला. त्यात निवडलेल्या शालेय मंत्रिमंडळाचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपविला.मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतदान विद्यार्थी उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर निकाल जाहीर केला. त्यानंतर आता सोमवारी याचा शपथविधी होणार आहे.
पाठ्यपुस्तकाच्या चाकोरी बाहेर जाऊन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तसेच अभ्यासक्रमाशिवाय प्रत्यक्ष अनुभव देणारा तंत्रज्ञानवाद रुजवण्यासाठी दप्तर मुक्त शनिवार उपक्रमांतर्गत ईव्हीएम मोबाईल अप्लिकेशन चा वापर झाला.तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रक जाहीर केले गेले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापक सौ.छाया विजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या उपक्रमात निवडणूक प्रशिक्षण अधिकारी श्री.राजन गरुड, नोडल ऑफिसर सौ. आरती संखे, झोनल ऑफिसर श्री.कल्पेश महादेवपाटील.केंद्राध्यक्ष सौ. उषा सूर्यकांत स्वामी,मतमोजणी अधिकारी सौ. स्वप्नाली
अभय पाटील, मतदान अधिकारी - कनिष्का कुडू इ.६ वी, शर्वरी कुंदन हातोडे , चंपा धनसिंह मेढा,नैतिक बुजड,इ.७वी. सुरक्षारक्षक म्हणून सोनू गुड्डू वर्मा इ. ७ वी प्रणित वाढाण इ.६ वी या सर्वांनी दिलेल्या जबाबदारी प्रमाणे आपापली कामे चोखपणे पार पाडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती कर्दळ चे सर्व सन्मा.अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य या अभूतपूर्व उपक्रमात आवर्जून उपस्थित होते.
शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक ही ईव्हीएम मशीनद्वारे केली व त्यासाठी होणारे प्रत्यक्ष नियोजन जिल्हा परिषद शाळा कर्दळ येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडले.
" प्रत्यक्षात मतदान कक्षात EVM मोबाइल ॲप च्या माध्यमातून विद्यार्थी उमेदवारांचे चिन्हासह मशीन वर नावे टाकून त्यास बटण दाबून प्रत्यक्ष मत देण्याचा लोकशाही अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला."सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटाला.
सौ.छाया विजय ठाकूर,मुख्याध्यापिका