वामांगी कविता (वारली अनुवाद ) मूळ अरुण कोलटकर

Rajan garud
0



वामांगी
(वारली अनुवाद )


देवलांत गेलू, तांव आतूच होतू

तथ इट्टल क्या दिसं नीही

रखमायचे ते कांशी निस्ती इटूच


म्यान्ह्यान सांगला असुं दे

रखमाय त रखमाय

कोणाचे त पायावं 

डोकां ठीवायचां


पायावं ठीवेल 

डोकां तांव काडून  घीतलां

आपलेलांच पूड मंघारशी

लागल तांव 


न जायाचे वक्ताला निसताच

रखमायला बोललुं

इठू कोढ जादेल हवां

दिसं निही



रखमाय सांगं

कोढ गेलां काय

उबा नीहि का 

माजे ये अंगाला


म्ह्याह्यान परत नांगला

खातर करून घियां

ना बोललू तथ

कोणीच निही मीलं


सांगं नाकाचे पुडच

नांगाय माजा जनम खपला

ते अंगाचा जुरुक 

कमी दिसतं ना


दगडाचे जशी झालू

तांव मानुच निसती पकडेल हाये नांग

अथं ना तथं

जूरुक हो होय निही


कवां येतो ना कवां जातो

कोढं जास ना क्या करतं

मना कायुच

माहित निही मीलं


खांदला खांद लावून ना

रोजचे माझे बाजूला हवा इठल

तांव मी हो येडीजसी

उबी रहलू


आसांड कारतिक चे वक्ताला

ओढी मानसां येत्यांन हर वरीस

मानां कसा काय कोनी

सांगेल निही हवां


आजचे येक वकत मानां

भेटाय धावतूच आलां

अट्टावीस कालचा 

येकलापन




✍️


श्री.राजन गरुड

पालघर,वारली अनुवाद


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


 🙏 *वामांगी* 🙏
(मूळ कविता)


देवळात गेलो होतो मधे

तिथं विठ्ठल काही दिसेना

रख्माय शेजारी

नुस्ती वीट


मी म्हणालो ऱ्हायलं

रख्माय तर रख्माय

कुणाच्या तरी पायावर

डोकं ठेवायचं


पायावर ठेवलेलं

डोकं काढून घेतलं

आपल्यालाच पुढं मागं

लागेल म्हणून


आणि जाता जाता सहज

रख्मायला म्हणालो

विठू कुठं गेला

दिसत नाही


रख्माय म्हणाली

कुठं गेला म्हणजे

उभा नाही का माझ्या

उजव्या अंगाला


मी परत पाह्यलं

खात्री करुन घ्यायला

आणि म्हणालो तिथं

कोणीही नाही


म्हणते नाकासमोर

बघण्यात जन्म गेला

बाजूचं मला जरा

कमीच दिसतं


दगडासारखी झाली

मान अगदी धरली बघ

इकडची तिकडं

जरा होत नाही


कधी येतो कधी जातो

कुठं जातो काय करतो

मला काही काही

माहिती नाही


खांद्याला खांदा भिडवून

नेहमी बाजूला असेल विठू

म्हणून मी पण बावळट

उभी राहिले


आषाढी कार्तिकीला

इतके लोक येतात नेहमी

मला कधीच कसं कुणी

सांगितलं नाही


आज एकदमच मला

भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगांचं

एकटेपण


✍ *अरुण कोलटकर*

======================





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)