वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी आता या APP च्या माध्यमातून होणार, चला सविस्तर जाणून घेऊया | INFOSYS SPRINGBOARD APP

Rajan garud
0

 वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी  आता या APP च्या माध्यमातून होणार, चला सविस्तर जाणून घेऊया.



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र अन्वये ...

राज्यातील शिक्षक / मुख्याध्यापक / अध्यापकाचार्य / प्राचार्य करिता ऑनलाइन प्रशिक्षण १ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन स्वरुपात

INFOSYS SPRINGBOARD या app च्या माध्यमातून होणार आहे.


INFOSYS SPRINGBOARD
 APP DOWNLOAD HERE






यामध्ये  महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.


सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये  त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.


अधिक माहितीसाठी पुढील विडियो जरूर पहा.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)