जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली पोर्टल चे अनावरण दिनांक 9 जून 2022 रोजी ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते होणार.
ग्रामविकास विभागाचे पत्र.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 8 जून 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय ७ एप्रिल 2019 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे.
- बदली पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग
- भाग दोन मधील शिक्षकांची यादी
- निवड रिक्त पदांची यादी
- संभाव्य रिक्त पदांची यादी
- जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इ. साठी
वेळोवेळी आपणास शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहे.
सदर धोरणातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन 2022 मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. सदर प्रणाली चे अनावरण गुरुवार दिनांक 9 जून 2022 रोजी दुपारी चार वाजता माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य महोदयांच्या हस्ते कक्ष क्रमांक 702 सातवा मजला मंत्रालय मुंबई येथे करण्यात येणार आहे. तरी सदर ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीच्या अनावरण कार्यक्रमास VC द्वारे उपस्थित राहण्याची विनंती सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना करण्यात आली आहे.