विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी हातात मिळणार कोरी करकरीत नवीन पुस्तके- आ. शिक्षणमंत्री वर्षाताई यांचे tweet
विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी हातात कोरी करकरीत नवीन पुस्तके मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. याच विचाराने यंदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे दि.१३ जून रोजी, आपल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके असतील, याचे नियोजन माझ्या विभागाने केले आहे. आज महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून माझ्या हस्ते पाठ्यपुस्तकांची पहिली गाडी रवाना झाली. लवकरच उर्वरित पुरवठा पूर्ण करण्यात येईल.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत इ.१ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी ५ कोटी ४० लाख ९० हजार ७०६ मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. या शिवाय खुल्या बाजारातील विक्री अंतर्गत इ.१ली ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी २९ लाख ३८ हजार ७०० पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत.