शालार्थ पे स्लिप कसे काढावे ? सविस्तर वाचन करा.ǀ Shalarth Pay Bill

Rajan garud
0
शालार्थ पे स्लिप कसे काढावे ? सविस्तर वाचन करा.
Shalarth Pay Bill


शालार्थ पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी Password बनवा.

  • https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp  या वेबसाईटला जा.
  • लॉग इन पेजवर जाऊन Username  म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
  • तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
  • लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका.
  • New password बनवा (त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
  • तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड Reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
  • लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
  • 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.

शालार्थ पोर्टलवरून सॅलरी स्लिप कशी डाउनलोड करावी ?


सर्वप्रथम,शालार्थ पोर्टलला भेट द्या. 
खालील चित्रावर क्लिक करा.

  • यानंतर,  तुमच्या UserId आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर स्क्रीनवर डॅशबोर्ड उघडेल.
  • डॅशबोर्डवर, मेनूमधून वर्कलिस्टवर जाणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर,  पेरोल>>पेरोल जनरेशन / पहा>>पे बिल व्युत्पन्न / पुन्हा निर्माण करा. वर क्लिक करावे लागेल. (Payroll>>Payroll Generation / View>>Generate / Regenerate Pay Bill)
  • जनरेट / रिजनरेट पे बिल पर्यायावर क्लिक केल्यानंतर, स्क्रीनवर एक नवीन विंडो दिसेल.
  • पृष्ठावर, ज्या महिन्याचे आणि वर्षाचे वेतन बिल तयार करायचे आहे ते निवडा.
  • आता, बिल क्रमांक निवडा आणि बिल प्रकारामध्ये पे बिल निवडा.
  • जनरेट बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्ही सॅलरी स्लिप/पेस्लिप डाउनलोड करू शकता.
  • धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)