स्वराज्याचे पहिले सरसेनापती नेतोजीराव पालकर मराठी माहिती | Netaji Palkar Marathi Mahiti

Rajan garud
0

 

स्वराज्याचे पहिले 

सरसेनापती नेतोजीराव पालकर 
Netaji Palkar Marathi Mahiti




नेताजी पालकर यांच नाव प्रत्येक व्यक्तीला माहित असेलच. स्वराज्याचे पहिले सरनोबत म्हणजे नेताजी पालकर. सर्वत्र नेताजी नाव घेतले जाते परंतु त्यांचे नाव हे नेतोजी पालकर होय. संपूर्ण शत्रू सैन्यात व स्वराज्यात प्रतिशिवाजी असा नेतोजींचा दरारा होता. 
स्वराज्यासाठी अनेक यातना सहन करत सदैव स्वराज्याशी एकनिष्ठ रहात, नेतोजी ते मुहम्मद कुलीखान आणि पुन्हा नेतोजी असा त्यांचा खडतर प्रवास त्यांनी केला.
नेतोजी पालकर यांचे मुळ गाव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर होय. नेताजींचा जन्म  अफजलखान भेटीच्या वेळी, पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी आणि शाहिस्तेखानाच्या हल्ल्यावेळी स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावत त्यांनी पराक्रम गाजवले. स्वराज्याचे सर्वात जास्त वेळ सरसेनापती राहण्याचा मान हा नेतोजींचाच!

नेतोजी हे स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच राजांच्या समवेत होते. रायरेश्वरी शपथ घेताना नेतोजीराव देखील उपस्थित होते. प्रतापगडाच्या युद्धात नेताजींवर जबाबदारी होती औरंगजेबाच्या सैन्याला रोखत त्यांना जेरबंद अथवा कत्तल करायची जबाबदारी. नेतोजीरावांनी पराक्रम गाजवला , प्रत्येक पळणारा आदिलशाही सैनिक कापून काढला. हंबीरराव मामांनी इथे बलाढ्य पराक्रम गाजवला त्याच प्रतिक आजही गडावरील मंदिरात त्यांची पालखी आणि तलवार सांगून जाते. याच लढाईत फितूर झालेल्या खंडोजी खोपडा याला महाराजांनी एक हात आणि एक पाय कापण्याची शिक्षा दिली, यावरून लक्षात येते कि स्वराज्यात फितुराची गय कधीच केली जात नव्हती. हा प्रसंग पुढे संधर्भासाठी आहे म्हणून इथे सांगितला.
यानंतर आदिलशहा ने स्वराज्यावर दुसरी मोहीम काढली.फाजलखान आणि रुस्तमजमा या दोन सरदारांना स्वराज्यावर चाल करून पाठवले. हा फाजलखान म्हणजे अफजलखानाचा मुलगा, खंडोजी ने त्याला तेव्हा मदत केली नसती तर आज हा स्वराज्यावर चाल करून आलाच नसता. परंतु या मोहिमेचा देखील नेतोजी पालकर यांनी फज्जा उडवला आणि या दोघांचा पराभव केला. आदिलशहा ने आता सिद्धी जौहरची मदत घेतली. सिद्दी ने पन्हाळागडाला वेढा दिला, राजे पन्हाळा गडावर पकडले गेले. परंतु या वेळी महाराजांच्या आदेशानुसार नेतोजीनी विजापूरजवळील शहापूर लुटले आणि विजापूरला धक्का दिला. नेतोजी पुढे चाल करत गेले होते, कोंडी करण्याचा प्रयत्न ते करत होते परंतु सैन्याच्या अभावामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नेतोजी पुन्हा राजगडावर आले, महाराज कोंडीत सापडल्याचे त्यांना कळले. नेतोजी सिद्दी हिलाल या अफजलखान वधावेळी स्वराज्यात शामिल झालेल्या सरदारला घेऊन वेढा फोडण्यासाठी गेले. परंतु या प्रयत्नात ते यशस्वी झाले नाही.

शाहिस्तेखान जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा स्वराज्य हे कोकण भागातील किल्ले आणि प्रांताच्या जोरावर तग धरून उभं होतं. शाहिस्तेखानाने स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आपला सरदार काहरतलब खान कोकणच्या मोहिमेवर पाठवला. त्याच्या सोबत अमरसिंह आणि रायबागण देखील होती. त्याने पेण जवळ असलेल्या महाराजांवर हल्ला करण्याचे ठरवले. जाण्यासाठी त्याने घाटमाथ्यावरील उंबरखिंडीची वाट पकडली. नेतोजी आणि महाराज यांनी खानाला आणि त्याच्या जवळपास २०००० सैन्याला याच उंबरखिंडीत पकडायच ठरवलं. नेतोजी रावांच्या आणि महाराजांच्या युक्तीने संपूर्ण सैन्य इथे कोंडल गेले आणि शेवटी काहरतलब खानाला तह करून माघारी परतावं लागलं. उंबरखिंडीच्या लढाईविषयी इथे क्लिक करून जाणून घ्या.
मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीत संभाजी महाराज असताना त्यांच्या सोबत नेतोजीराव देखील सुरक्षेसाठी होते. तहाच्या बोलणीनुसार महाराज मोघलांकडून लढत होते. महाराज, नेतोजीराव, दिलेरखान हे विजापूरवर आक्रमण करण्यासाठी गेले परंतु सर्जाखान समोर निभाव लागला नाही. पहिल्या पराभवानंतर महाराजांनी मोर्चा पन्हाळ्याकडे वळवला. रात्रीची वेळ होती आणि मदतीला पाठीमागून एक तुकडी घेऊन नेतोजी राव येणार होते. 
महाराजानी अवघ्या १००० मावळ्यांनीशी गडावर हल्ला केला, महाराजांना असे वाटले की किल्लेदार बेसावध असेल, असे बरेच इतिहासकार लिहितात. परंतु महाराजांनी कुठलंच नियोजन अस विचार न करता केलेलं नव्हतं त्यामुळे हा निर्णय विचार करून घेतलेला असेल. नेतोजी राव वेळेवर पोहोचले नाही आणि महाराजांना पराभव स्वीकारावा लागला. जवळपास १००० मावळे मारले गेले, संतापाने महाराजानी नेतोजीना खणखणीत बोल सुनावले की, ' समयास कैसा पावला नाही?' . असे सभासद बखरीत लिहितो. नेतोजींकडून सरनोबती देखील काढून घेतली जाते.

हे बोल नेतोजी रावांच्या जिव्हारी लागले, नेतोजीराव नाराज होऊन आपले चुलते कोंडाजी सोबत आदिलशहा ला जाऊन मिळाले. विजापुरकरांनी नेतोजीना खमम परगण्यातील जमकोर ची जहागिरी प्रदान केली. मिरझाराजे जयसिंग यांनी पुढचा धोका लक्षात घेत नेतोजींना आपल्याकडे वळवत ५ हजारी मनसब आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव मधील तामसा परगण्यातील ५५ गावांची जहागिरी देऊ केली.
याच काळात महाराज आग्र्याला कैदेत होते, महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले. औरंगजेबाला हे कळताच त्याच्या डोक्यात पुढील विचार आला की जर प्रतिशिवाजी पुन्हा शिवाजी महाराजांना मिळाले तर...? त्याने तात्काळ निर्णय घेत १९ ऑगस्ट १६६६ रोजी नेतोजीरावाना अटक करण्याचे फर्मान आग्र्याहून सोडले. त्यावेळी मिर्झाराजाचा तळ हा उस्मानाबाद मधील भूम येथे पडला होता. २४ ऑक्टोबर १६६६ रोजी मोघलांच्या तळात धारूर येथे असलेले नेतोजी व कोंडाजी पालकर यांना अटक करण्यात आली.
नेतोजीरावांना आग्र्याला पाठवण्यात आले. तिथे त्यांचा अतोनात छळ करण्यात आला, त्यांना धर्म बदलण्यासाठी छळले गेले, अखेर २७ मार्च १६६७ रोजी नेतोजींचा धर्म बदलला गेला. नेतोजीरावांचे आता मुहम्मद कुलिखान झाले. औरंगजेबाच्या हुकुमावरून १६६७ मध्ये त्यांना काबुल कंदाहार च्या मोहिमेवर पाठवले गेले. लाहोरजवळ असताना नेतोजीनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ते पकडले गेले. 'असे होते मोगल' या ग्रंथामध्ये मोघलांच्या तोफखान्याचा प्रमुख आणि जातीने इटालियन असलेला मनूची लिहितो, "मी स्वतः नेताजी सोबत मुघलांच्या चाकरीत असून नेताजीने पळून जाण्याचा प्रयत्न केला व त्याला जबर शिक्षा झाली."

जवळपास ९ वर्ष नेतोजी काबुल कंदाहार कडेच मोहिमेवर होते, त्यांनी औरंगजेबाचा थोडाफार विश्वास संपादन केला. स्वराज्यात खूप काही घडामोडी घडल्या, ६ जून १६७४ ला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्यात एकापाठोपाठ एक किल्ले घेतले जात होत, पन्हाळा देखील ताब्यात आला होता. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दिलेरखान व मुहम्मद कुलिखान यांना औरंगजेबाने स्वराज्यात पाठवले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)