🚩🚩॥ जय जिजाऊ॥ ॥ जय शिवराय ॥ 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज - CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
🚩🚩 वीर येसाजी कंक सरदार 🚩🚩
येसाजी कंक
शिवाजी राजे एकदा गोवळकोंड्याला बादशहा कुतूबशाह याच्या भेटीस गेले असता.. कुतुबशहाने राजेंचे मोठे जंगी स्वागत गेले.. आपली सैन्यशाळा, पाकशाळा, दल, घोडे,हत्ती यांची फौज शिवाजी राजांना मोठ्या दिमाखात दाखवीली.. राजे ती त्याची ताकद पाहून पुरते भारावले. चाणाक्ष कुतूबशहाने अगदी सहजपणे राजेंना विचारले.. “शिवाजी राजे आपल्या कडे असे हत्ती असतीलच ना?” खर पाहता महाराज गडबडले.. कारण सह्याद्रीच्या दरया खोरयात कडेकपारीत हत्तीची फौज उभी करुन काय फायदा.. त्यामुळे स्वराज्यात राजेंकडे हत्ती नव्हतेच.. पण बादशहाला हे कारण कसे बोलणार म्हणून मंद हसत राजे कुतूबशहाला बोलले आमच्या कडे हत्ती नाहीत.. तर हत्ती सारखी माणसे आहेत.. त्यावर छदमी हसत बादशहा बोलला.. तर मग होऊन जाऊदे माझ्या हत्तीबरोबर व तुमच्या हत्तीची झुंज.. आणि मग राजेनी इशारा करताच स्वराज्यातील शूर वीर मावळा येसाजी कंक मैदानात उतरला.. आता येसाजी मरनार असेच सारयाना वाटले पण येसाजी व राजे शिवाजी निर्धास्त होते.. हा हा म्हणता झुंज सुरु झाली.. आणि कुतूबशहाचा हत्ती राजेंच्या येसाजी नामक हत्ती पुढे घायाळ होऊन पडला. त्याचे गगनभेदी शौर्य पाहून बादशहा कौतुक करु लागला.. आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा त्याने येसाजीस बक्षिस दिला पण तो स्वराज्यप्रेमी मावळा गरजला.. आमचं कौतूक करायला आमचं राज समर्थ आहेत.. आणि तो कंठा येसाजीने बादशहास साभार परात केला.. असे हे सरसेनापती येसाजीकंक हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्वासु सरदारांपैकी एक होते.
येसाजींचा जन्म कोळी जमातीत १६२६ मध्ये त्यांच्या भूतोंडे या गावी राजगड किल्ल्याच्या पायथ्या नजिक झाला. त्यांच्या वडीलांचे नाव दादोजी कंक .
येसाजी कंक यांच्या विषयी आम्ही काय बोलनार.. ते एक असामान्य व्यक्तिमत्व होते.. त्यांची उंची ७फुट तर त्यांच्या अंगी १०० हत्तीचे बळ होते तर त्यांची तलवार १२३किलो वजनाची होती असे इतिहासकार गर्वाने लिहीतात.
इतिहासामध्ये येसाजींचा उल्लेख बर्याच ठिकाणी झालेला आढळुन आला आहे. आपल्या अनेक कामगिरींनी त्याने शिवाजी राजेंचे मन जिंकून घेतले होते.. स्वराज्याच्या इतिहासात येसाजी नामक सुवर्णापान चमकत आहे व राहिल.
कुतुबशहाच्या मदोंमद हत्तीशी झुंज तर केलीच याशिवाय स्वराज्य निर्मीतीच्या कार्यात त्यांनी केलेल्या पराक्रमाला तोड नाही. राजेनी एखादी जोखीम सोपवावी व ती जोखीम पार पाडून फत्ते मिळवूनच माघारी यावे असे होते येसाजी.
शिवाजी महाराजांनंतर येसाजी व त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे संभाजी महाराजांच्या काळात गोव्यातील फोंडा किल्ल्याची किल्लेदारी करत होते. १६८३ मध्ये मराठा व गोवेकर पोर्तुगीज यांच्यात लढाई झाली. तत्कालीन व्हाईसरॉय कौंट दी अल्वर याने प्रचंड सैन्यानिशी हल्ला केला. पण केवळ ४०० सैनिकांसोबत पोर्तुगीजांना तोंड देत येसाजी व त्यांचे चिरंजीव कृष्णाजी या पितापुत्रानी पोर्तुगीजांच्या आधुनिक व लांब पल्ल्याच्या तोफखाण्यास यशस्वी तोंड दिले. तोफखाण्याने ढासळलेल्या भिंती बांधून काढत व मराठ्यांना धीर देत राहिले व फोंडा किल्ला अजिंक्य राहिला. फोंड्याच्या लढाईमध्ये या कंक पिता-पुत्रांनी अद्भूत पराक्रम गाजविला. याच लढाईत कृष्णाजी कंक धारातिर्थी पडले होते व येसाजी कायमचे जायबंदी झाले. या लढाई नंतर संभाजी राजे स्वता भुतोंडे येथे येसाजी कंक यांच्या घरी त्यांच्या घरान्याचे सांत्वन करण्यासाठी गेले असल्याची नोंद इतिहासामध्ये आहे.
छत्रपती संभाजी राजेंच्या काळातही त्यांनी आपले शौर्य स्वराज्याच्या नावावर केले होते.. शेवटच्या श्वासापर्यंत त्यानी उभा जन्म स्वराज्यस अर्पिला होता. फोंड्याच्या लढाईनंतर येसाजी यांच्या हालचालीचे साधार पुरावे मिळत नाहीत. वयोवृद्ध येसाजी पुढे मराठेशाहीच्या कार्यात कार्यरत असतील ही यात शंकाच नाही.
येसाजींचे द्वितीय पुत्र चाहुजी यांचा वंश पुढे चालत आला. त्यांचे वंशज अजुनही भुतोंडे येथे येसाजींच्या वाड्यात राहतात. हा वाडा व येसाजी कंक यांनाी वापरलेली शस्त्रे सर्व शिवभकतांना पाहावयास मिळतात.
येसाजी कंकांचे १२ वे वंशज श्री रामभाऊ कंक (आप्पा) हे मावळ व वेळवंड खोर्यातील एक प्रभावशाली नेतृत्व होते व पंचायत समिति भोर चे सभापती होते. आप्पांनंतर त्यांचे बंधु भगवान काका कंक हे सुद्धा समाजकार्यात आहेतच. तसेच आप्पांचे पुत्र व येसाजी कंक यांचे १३ वे वंशज शशिकांत कंक, संजय कंक व राजेंद्र कंक आणि काका कंकांचे पुत्र शिवाजी कंक हे सुद्धा कंक घरान्याचे नाव व परंपरा जपत आहेत. अजुनही त्यांच्या पाऊलावर पाय ठेऊन त्यांची भावी पिढी लोकसेवा व समाज कार्यात योगदान दाखवते आहे.. .
थोरल्या शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पा पासून, रायरेश्वराच्या देऊळात शपथ घेण्यापासून, अनेक कामगिरीत येसाजी राजेंबरोबर होते. शिवराज्याभिषेक, संभाजी राजेंचे पर्व, राजाराम राजेंचा काळ, ताराबाई रानीचे पर्व व शेवटी शाहू महारांजाची सुरवात पाहूनच १७१६ मध्ये येसाजी कंक नावाचे शूर शिलेदार राजेंच्या भेटीस कैलासवासाला गेले. येसाजींची भोर येथे समाधी आहे. त्यांच्या कार्यावर फतेशिकस्त हा सिनेमा आहे तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटगर धरणाला येसाजी कंक धरण हे नामकरण केले आहे.
येसाजी गेले.. पण ते संपुर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या रोमारोमात, सह्याद्रीच्या कणांकणात आपल्या कार्याने जिंवत आहेत. अशा शुर वीर स्वराज्याच्या शिलेदारास नमन..