डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अप्रतिम मराठी भाषण
शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती,
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा मुखी नारा
राज्यघटनेचा खरा शिल्पकार,महामानव भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा !
सन्माननीय विचारमंच व विचारमंचावरील मान्यवर,वंदनीय गुरुजनवर्ग येथे उपस्थित सर्व श्रोतेहो.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायुद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवटणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भीमराव रामजी आंबेडकर यांचे पूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मांडणी स्वीकारावी लागली, पण त्यामुळेच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दिन दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.
भीमरावांनी आपले उच्चशिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा !" हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब दीनदलित समाजाच्या न्याय्य हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले.डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. नाशिक मधील काळाराम मंदिर यामध्ये तीन दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.
समाजाने नाकारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले. मुकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक समता हे वृत्तपत्र सुरु करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले. स्त्रीशिक्षणाचा सदैव पुरस्कार केला.
अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव ज्ञानसवादी,तपस्वी,अमोघ वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी, युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले.आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती,चैतन्य देत आहेत धन्यवाद !