डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी भाग १ Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Part 1

Rajan garud
0

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी  भाग १  

Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Part 1




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सुप्रभात, आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आज मला आपल्या संविधानाचे जनक डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काही ओळी सांगण्याचा मान मिळाला. सर्वप्रथम, मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो.

“ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे. माणसाने आयुष्यभर शिकायचे . म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की या ज्ञानसागरामध्ये केवळ गुढगाभर पाण्यात पोहचू शकेल एवढेच ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे.”

मित्रांनो, हे शिक्षणाविषयीचे मत कोणाचे आहे माहित आहे तर विचार आहेत महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. आपल्या मुलाने खूप शिकावे; मोठे व्हावे नाव कमवावे ही वडीलांची इच्छा त्याप्रमाने त्यांच्या वडीलांनी मुलाच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले त्यांचे मुळचे गाव आंबवडे असल्यामुळे त्यांनी मुंबईत आल्यावर आंबेडकर हे आडनाव धारण केले आणि तेच पुढे रुढ झाले.

डॉ. बाबासाहेबांना अभ्यासाची खूप आवड; पण घरची परिस्थिती अगदी बेताचीच त्यामुळे इकडून तिकडून जमलेली अभ्यासाची सामग्री आणि रात्रीचा मुंबईच्या रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश या दिव्यातून त्यांनी आपले शिक्षण उत्तमपणे पूर्ण केले. १९०७ मध्ये मॅट्रीक (शालांत) परिक्षा उतीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन या प्रख्यात महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची परीक्षा १९१२ मध्ये उत्तीर्ण केली.

उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. व अमेरिकेतील कोलंबिया विद्यापिठात त्यांना प्रवेश मिळाला. त्यासाठी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांचे सहाय्य लाभले. बाबासाहेबांनी त्या संधीचे सोने केले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. १९१५ मध्ये त्यांनी ‘प्राचीन भारतातील व्यापार’ या विषयावर प्रबंध लिहून एम. ए. ची पदवी मिळविली तसेच त्यांच्या National Deividout of India a historical and analitical study या प्रबंधाला कोलंबिया विद्यापीठाने पी. एच. डी. पदवी बहाल केली.

अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करुन भारतात आल्यावर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. त्यानंतर इंग्लंड येथे जाऊन कायदा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. बॅरिस्टर ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली सुरु केली.


मुंबईमध्ये त्यांनी लोकजागृती व सामाजिक कार्यास सुरुवात केली. ३१ जानेवारी १९२० मध्ये त्यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक त्यानंतर ‘बहिष्कृत भारत’ १ हे साप्ताहिक सुरु केले. दलित समाजामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाटी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा व समाज समता संघाची स्थापना केली. त्या मार्फत दलित समाजातील तरुण व प्रौढांसाठी रात्रशाळा चालविणे वाचनालये सुरु करणे आदि उपक्रम त्यांनी सुरु केले. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे व माध्यामातून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय व वसतीगृहे त्यांनी सुरु केली.

२० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी खुले करुन दिले. त्याचप्रमाणे नाशिकच्या काळाराम मंदीरातील सत्याग्रह, अस्पृश्यांना राखीव जागांसाठीचा महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील पुणे करार, गोलमेज परिषदांमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधीत्व यामुळे त्यांचे नाव भारतीयं नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय राज्यघटना २ वर्षे ११ महिने. १८ दिवसात तयार केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची घटना तयार करण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. त्यांच्या या कर्तृत्वावर ‘भारतरत्न’ सन्मानाची मोहोर उमटली.

६ डिसेंबर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने सारा देश हळहळला. दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय घटनेच्या या शिल्पकारास आमचा कोटी कोटी प्रणाम.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)