फिट इंडिया चळवळी अंतर्गत उपक्रम दिनदर्शिका
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
३. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व).
५. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६. प्रशासन अधिकारी म.न.पा. / न.पा.(सर्व)
विषय : फिट इंडिया चळवळी अंतर्गत उपक्रम दिनदर्शिकेबाबत...
संदर्भ : १) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. १२-१/२०१९ IS-४ दि. २७ नोव्हेंबर, २०१९.
२) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र F.No. 15-1/2022-IS.4 दि. २४ फेब्रुवारी, २०२२.
उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये, फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते क्रीडा दिनी दि. २९ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेला आहे. यावेळी मा. पंतप्रधान महोदयांनी फिट इंडिया चळवळीद्वारे भारत आणि भारतीयांना सन २०२२ पर्यन्त तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. फिट इंडिया चळवळीचा मुख्य उद्देश हा तंदुरुस्तीचे महत्त्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे असा आहे. भारत हा युवकांचा देश असल्यामुळे विद्यार्थ्यांना, युवकांना शारीरिक सदृढतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत डिसेंबर २०१९ पासून विविध उपक्रम सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
त्यानुषंगाने संदर्भ क्र. २ नुसार फेब्रुवारी २०२३ पर्यंतचे माहेवार नियोजन करून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यासंदर्भात आपल्या अधिनस्त शाळांना आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.
सोबत : उपक्रमांचे माहेवार नियोजन
एम.डी.सिंह( भा. प्र. से )
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे