सौ.शिल्पा बळवंत वनमाळी यांचा रत्नसिंधु महासन्मान सोहळा 2022 मध्ये ,दोन पुरस्कार देऊन सत्कार .

Rajan garud
0

 सौ.शिल्पा बळवंत वनमाळी यांचा रत्नसिंधु महासन्मान सोहळा 2022  मध्ये ,दोन पुरस्कार देऊन सत्कार .



नवोपक्रमशील आणि आदर्श शिक्षिका तसेच साहित्यिका सौ .शिल्पा बळवंत वनमाळी यांना,  रत्नसिंधु साहित्य रत्न पुरस्कार 2021 आणि राज्यस्तरीय रत्नसिंधु नारीशक्ती सन्मान 2022  ह्या  दोन पुरस्काराने  रत्नसिंधु महासन्मान सोहळा 2022 ,जिल्हा रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात दि .१५ एप्रिल २०२२ रोजी  सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सौ .शिल्पा वनमाळी मॅडम या डहाणू तालुक्यातील, जि. प. शाळा आगवन नवासाखरा येथे कार्यरत असून  मॅडमची डहाणू तालुक्यात आदिवासी दुर्गम भागात १७ वर्षे  सेवा झाली असून, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकासासाठी सतत नवोपक्रमशील उपक्रमांच्या माध्यमातून अध्यापनाचे पवित्र कार्य करीत असतात . त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊन राज्यस्तरीय  रत्नसिंधु नारीशक्ती 2022 हा पुरस्कार देऊन त्यांना रत्नसिंधु कोकण विभाग कलामंच यांच्या तर्फे  गौरविण्यात आले .



तसेच वनमाळी मॅडम याच्या स्वलिखित कवितांचे  प्रकाशित  झालेले शिल्पकाव्य या काव्यसंग्रहाला रत्नसिंधु साहित्यरत्न  हा पुरस्कार जेष्ठ साहित्यिका प्रा.कीर्ती काळमेघ - वनकर ,प्रसिद्ध गझलकार  बाळासाहेब लबडे ,शाहीर जनार्दन मोहिते , रत्नसिंधु संस्थेचे संस्थापक श्री .सुनील जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य क्षेत्रातील  उत्तम कामगिरी बद्दल प्रदान करण्यात आला .

कोकणातील निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यात रत्नसिंधु महासन्मान सोहळा 2022 , शुक्रवार १५ एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)