चला आता घडीकाम करूया. कार्यानुभव हस्तकला - कागदकाम

Rajan garud
0

 चला आता घडीकाम करूया. कार्यानुभव हस्तकला - कागदकाम





कार्यानुभव विषयाची ठळक उद्दिष्टे


1. श्रमप्रतिष्ठा श्रम आणि कौशल्यांवर आधारित कामे करणे, तसेच श्रमजीवी लोकांबद्दल आदराची भावना ठेवून सन्मान करणे.

2. उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणे, तसेच उपजत असलेल्या गुणांना वाव देऊन उद्योजकतेविषयीचे आवश्यक ज्ञान देणे.

3. जीवनक्षमता विकसित करणारी कौशल्ये विद्यार्थ्यांच्या गरजा व समस्या याच्याशी निगडित उपक्रमांद्वारे निरोगी व आनंदमय जीवन जगण्यासाठी कौशल्ये विकसित करण्यास करणे.

4. समाजोपयोगी व कार्यजगताचे समन्वेषण कार्यानुभवातील उपक्रमांतून समाजातील उद्योगमूलक कार्यांची ओळख करून घेण्याची संधी प्राप्त करून देणे आणि समाज विकसनासाठीत्यांचा उपयोग करण्याची क्षमता निर्माण करणे.

5. कार्यातील स्व-भूमिकेची समज विविध उपक्रमांतील कार्यनिश्चिती नंतर, त्या कार्यातील स्व-भूमिका समजावून घेऊन त्यातील कार्यकारणभाव, शास्त्रीय तत्त्वे व क्रमवारिता यांविषयीची माहिती घेणे.

6. अर्थोत्पादन विकास उत्पादन उपक्रमांचा सराव करत असताना विद्यार्थ्यांमध्ये उत्पादनास आवश्यक अशी प्राथमिक कौशल्ये निर्माण करणे व शक्य तेथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात मर्यादित अर्थोत्पादन करण्याची क्षमता निर्माण करणे.

7. कार्यकौशल्य विकास उत्पादन कार्यातील सुबकता, अचूकता, आकर्षकता, गती, निर्मिती, प्रदर्शन व विक्री यांबाबतची कौशल्ये विकसित करणे.

8. सामाजिक कार्य-संस्कृतीचे जतन व संवर्धन परिसरातील विविध कार्यांची ओळख करून घेणे, सामाजिक रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्यामागील कार्यांची ओळख करून घेणे, त्यांचे जतन व संवर्धन करण्यास मदत करणे.

9. समान अनिवार्य उपक्रम सर्व शाळांमध्ये उपक्रमांच्या बाबतीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये समाजोपयोगी कार्याची वृत्ती जोपासण्यासाठी समान अनिवार्य उपक्रमांची योजना करणे.

10. कार्यानुभवातून पर्यावरणाची जाणीव नैमित्तिक स्वरूपाच्या उपक्रमांतून, तसेच उत्पादक उपक्रमांतून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची जाणीव निर्माण करणे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)