देव माझा माझा अभंग | शाळापूर्व तयारी | abhang Marathi

Rajan garud
0

 

देव माझा  माझा अभंग | शाळापूर्व तयारी 
  abhang  Marathi  



COVID19 मुळे मार्च 2020 पासून शाळा अचानक बंद झाल्या... आता हळू-हळू शाळा पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण शाळा पुन्हा नव्याने सुरु करताना विशेष काहीतरी केले पाहिजे, म्हणून प्रथम संस्था, MSCERT, समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन मार्च ते जून २०२२ या दरम्यान शाळापूर्व तयारी अभियान चालविण्याचे योजिले आहे.

मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरूवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणे त्यांना सहज होऊ शकेल.

अनेक अहवालातून आणि अनुभवातून असे आढळले आहे कि मुलं शाळापूर्व तयारी अभावी इयत्ता पहिलीत येतात आणि त्यांना औपचारिक शिक्षण प्राप्त करताना अनेक अडचणी येतात. परिणामतः पुढे वाचन-गणिताच्या पायभूत क्षमता देखील पूर्णपणे विकसित होत नाहीत. अशी मुलं पुढे जाऊन अभ्यासात मागेच पडतात. शिवाय यंदा इयत्ता १-२ री मधील मुलांनी नीट अंगणवाडी आणि शाळा सुद्धा अनुभवलेली नाहीय.

शाळा पुन्हा सुरु होत असताना गावस्तरावर पालक, शिक्षक, अंगणवाडी, तरुण स्वयंसेवक, ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी राज्यव्यापी मोहिम घेण्याचे आखले आहे. 


अभंग  गीत पहा. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)