'डिजिटल इंटरऍक्टिव्ह बोर्ड' ने 14 जिल्हा परिषद शाळा बनल्या स्मार्ट स्कूल

Rajan garud
0

 'डिजिटल इंटरऍक्टिव्ह बोर्ड' ने 14 जिल्हा परिषद शाळा बनल्या स्मार्ट स्कूल
आर्थिक सहकार्य ONGC मुंबई, सौजन्य थिंकशार्प फाऊंडेशन महाराष्ट्र



कोरोना महामारीच्या काळानंतर सुरू झालेल्या शाळांमधील मरगळ दूर व्हावी मुलं नव्याने उत्साहाने शाळेत यावीत यासाठी शिक्षक व्यवस्थापन समिती सरकार प्रयत्न करत आहे. सामाजिक संस्था व मोठ्या कंपन्या सुद्धा आपल्या प्रयत्नांने शाळांना नवीन ऊर्जा देत आहेत.


डिजिटल शाळा केवळ प्रोजेक्टर व पडदा इतके मर्यादित न राहता स्मार्ट शाळा व्हाव्यात यासाठी ONGC मुंबई यांच्या सहकार्याने व थिंकशार्प फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने पालघर जिल्हा किनार पट्टीजवळच्या 14 जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल इंटर ऍक्टिव्ह स्मार्टबोर्ड क्लास उदघाटन संपन्न झाले. 


आज जि प शाळा मल्याण मराठी, डहाणू येथे डिजिटल स्मार्टबोर्ड क्लास चे उदघाटन संपन्न झाले उदघाटन प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते. 

श्री किरण निकम, व्यवस्थापक, ONGC , मुंबई

श्रीमती देबस्मिता नाथ, व्यवस्थापक, ONGC, मुंबई

श्रीमती अंकिता, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, ONGC, मुंबई

श्री संतोष फड, संस्थापक, थिंकशार्प फौंडेशन

श्री अमित कुतवळ, व्यवस्थापक, थिंकशार्प फौंडेशन, SMC अध्यक्ष सारिका दुबळा, पत्रकार बांधव श्री अनिरुद्ध पाटील व श्री रफिक गाछि तसेच पालकवृंद व शिक्षकवृंदानी सदरील साहित्याचे उपयोग समजून घेतले. 





थिंकशार्प फाऊंडेशन कडून ONGC व्यवस्थापक यांना मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले. प्रसंगी जि प शाळा मल्याण मराठीचे शिक्षक श्री आनंद आनेमवाड यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ICT मिळाल्याबद्दल थिंकशार्प फाऊंडेशन कडून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची धुरा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता पटेल मॅडम व सर्व शिक्षकवृंदानी सांभाळली. शाळेला उत्तम साहित्य प्रदान केल्याबद्दल शाळेने ONGC मुंबई व थिंकशार्प फाऊंडेशन चे आभारपत्र देऊन आभार मानले. पालक वर्गाकडून शाळेत नवीन डिजिटल साहित्य वापराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.


या शाळेबरोबर उर्वरित 13 शाळांत या स्मार्ट डिजिटल क्लास चे उदघाटन संपन्न झाले.


जि प शाळा मल्याण मराठी डहाणू

जि प शाळा  आगर,डहाणू

जि प शाळा धाकटी डहाणू

जि प शाळा डहाणू न 2

जि प शाळा उच्छेली पालघर

जि प शाळा खरेकुरण पालघर

जि प शाळा टेम्भी पालघर

जि प शाळा गवराई पालघर

जि प शाळा एडवन पालघर

जि प शाळा अर्नाळा गाव वसई

जि प शाळा अर्नाळा फोर्ट वसई

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)