स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ तडफदार भाषण २ l Rajmata Jijau Speech in Marathi 2

Rajan garud
0

 

 स्वराज्यजननी  राजमाता जिजाऊ  तडफदार भाषण २

 Rajmata Jijau Speech in Marathi 2


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भाषण 

सर्व प्रथम सन्माननीय राजमाता जिजाऊ  साहेब आणि वन्दनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो / करते. 

राजमाता जिजाऊ जयंती (Rajmata Jijau Jayanti) च्या पवित्र मुहूर्तावर या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्या समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र व मैत्रिणी आणि पालक या सर्वांना माझा नमस्कार.


जिजामाता, (राजमाता जिजाऊ - Rajmata Jijau) यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी भुईकोट राजवाड्या मधे, बुलढाणा (महाराष्ट्र) जिल्ह्यातील सिंदखेडा  किंवा सिंदखेड प्रांत  या स्थळी झाला होता, हे आपणा सर्वांना माहिती आहे. 

राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्य राज्य चे संस्थापक माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या. आज सिंदखेड हे ठिकाण केवळ ऐतिहासिकच नव्हे तर, प्रसिद्ध पर्यटन स्थळ सुद्धा बनले आहे. दरवर्षी सिंदखेड या स्थळी "राजमाता जिजाऊ यांची जयंती (Rajmata Jijau Jayanti in Marathi)" मोठ्या उत्साहात साजरी केली जातो. हि गर्वाचीच बाब म्हणा. 

राज माता जिजाऊ यांना प्रेमाने ‘जिजा ’ म्हटले जायचे. लखोजी राजे जाधव म्हणजे राजमाता जिजाऊ यांचे वडील हे परंपरेने देवगिरीचे असलेले यादव (जाधव) होते. या मुळे, जिजाबाई ही देवगिरीची राज कन्या होत्या. पण त्या काळाच्या तत्कालीन परिस्थिती मध्ये लखोजी राजे यांनी आपल्या तीन मुलांसह सुलतानाच्या सैन्यात सरदार होण्याचे मान्य केले. ही गोष्ट जिजाबाईंना फार खटकली होती. 

राजमाता जिजाऊ यांना वाटायचे कि, जे लोक आपल्या माणसांना छळतात, आपल्या हिंदू दैवतांची विटंबना करतात, गोर- गरीबांची- कष्टाळू शेतकऱ्यांची आर्थिक आणि शारिरीक शोषण करतात, महिलांवर नको ते शारिरीक- मानिसक अत्याचार करतात अश्या लोकां सोबत आपण का म्हणून काम करायचे ?  

चिमुकल्या वयात राजमाता जिजाऊ यांना पडलेला हा प्रश्न त्यांच्या मध्ये असलेली क्रांतीज्योत दाखवून देणारी आहे. 

कदाचित इथूनच राजमाता जिजाऊ यांच्या मनात असा विचार आला असावा कि, या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी असं एक राज्य असावं जेथे महिलांना सन्मान, कष्टाळू शेतकरी यांना मान आणि शोषण मुक्त समाज असावा. 

पुढे राजमाता जिजाऊ यांचे शहाजी राजे भोसले यांच्या सोबत त्या विवाह बंधन मध्ये अडकल्या. येथून त्यांच्या जीवना मध्ये एक टर्निंग पॉईंट आला. 

पुढे एका घटने मुळे लखोजी राजे जाधव आणि भोसले कुळ यांच्या मध्ये वैचारिक मतभेद आणि आपसी रणजिशमुळे दोन्ही कुळा मध्ये तडा पडली. राजमाता जिजाऊ यांच्यासाठी हि तडा जेवढी राजकीय होती त्याहून हि अधिक भावनिक होती. कारण या घटनेमुळे त्यांचं माहेर घर त्यांच्या पासून दूर झाले होते. 

नंतर काही वर्षांनी काही कारणास्तव शहाजीराजे भोसले यांना पकडण्यासाठी निजामाने लखोजी राजे जाधव यांना आपल्या सैन्या सह जुन्नर ला पाठवले होते. तेव्हा राजमाता जिजाबाई गरोदर असल्याने त्यांना घोड्यावर बसून पुणे कडे प्रवास करणे शक्य नव्हते. म्हणून शहाजीराजे यांनी जिजाऊ माता यांना विश्वासराव आणि वैद्यराज निरगुडकर (एक डॉक्टर) यांच्या देखरेखी खाली शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. या दरम्यान, लखोजी राजे जाधव जुन्नरला पोहोचले आणि अनेक वर्षांनी त्यांची अनियोजित आपल्या मुलीसोबत शिवनेरी किल्ल्या वर भेट झाली. 

तेव्हा जिजाबाई वडिलांना म्हणाल्या, ‘मराठे केवळ अहंकार आणि लोभासाठी एकमेकांशी भांडत आहेत. जर त्यांच्या शूर तलवारी एक झाल्या तर परकीय आक्रमकांचा काही क्षणातच पराभव होईल. आपल्या उदरनिर्वाहासाठी आक्रमकांच्या हाता खाली काम करणे हे मराठ्यासाठी अपमानास्पद आहे, आपण ते सोडले पाहिजे '. 

राजमाता जिजाबाईंची प्रखर देशभक्ती आणि धर्मप्रेम त्यांच्या वडिलांना स्पर्शून गेले. जिजाऊंच्या मनस्वी विचाराने लखोजीराजे यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. यामुळे जाधव आणि भोसले यांच्यातील वैर कायमचे संपुष्टात आले.

या एका घटनेने राजमाता जिजाऊ यांच्या मधील ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा भरून देण्याचे काम केले. आणि या एका घटनेमुळे राजमाता जिजाऊ यांना कळून चुकले होते कि, स्वराज्य निर्मिती होणे हि संकल्पना अशक्य नाही. परिणामी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बाल वयापासूनच स्वराज्य निर्मितीचे बालकढू देण्यास सुरुवात केली. 

जिजाऊ मातेने, शिवाजी राजे यांना उत्तम नैतिकतेचे, शास्त्र आणि शस्र यांची शिकवण दिली. त्यांना बुद्धीने चतुर आणि शस्रात विपुल बनवले आणि लहानपणापासूनच त्यांच्या मध्ये स्वतंत्र स्वराज्य निर्मितीची इच्छा जागृत केली. 

राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापने ची शपथ घेतली आणि वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी एका छोट्या सैन्याचा ते नेता बनले. आणि पुढे कश्या प्रकारे शिवाजी राजे भोसले यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती ची संकल्पना ते सिद्धी गाठली,  हे आपणा सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. 

स्वराज्य निर्मितीसाठी राजमाता यांनी फक्त शिवाजी राजे भोसले यांनाच प्रेरित नव्हते  केले तर या सोबत त्यांनी आपले वडील लखोजी राजे जाधव आणि त्यांचे पती शहाजी राजे भोसले यांना मुघलांची सेवा सोडून स्वतंत्र "स्वराज्य" राज्य स्थापन करण्यास प्रेरित केले. कारण राजमाता जिजाऊ यांचे ध्येय फक्त महाराष्ट्रातून परकीय आक्रमकांना पळवून लावने नव्हते तर, सर्व मराठी सरदारांना संगठीत करून मराठा साम्राज्य उभे करायचे हे हि होते. 

जिजामाता जिजाऊ यांना आपल्या अधिकार क्षेत्रातील प्रांताला कल्याणकारी राज्य बनवण्याची खूप इच्छा होती. म्हणून राजमाता जिजाऊ या, आपल्या हद्दीतील प्रांतात घडणाऱ्या प्रत्येक आर्थिक- सामाजिक- राजकीय- न्यायिक घडामोडीं मध्ये स्वतः हून सक्रिय रस घेत असे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यां वर आपले मत मांडत असे. 

आणि ते म्हणतात ना, 

"मंजिल सिर्फ उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, 

सिर्फ पंख होणे से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है !"


असाच हौसला (आशा) हा राजमाता जिजाऊ यांच्या अंगी होता. म्हणूनच त्यांच्या स्वतंत्र "स्वराज्य " राज्या ची महत्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केली. आणि राजमाता जिजाऊ यांच्या अधिपत्या खाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक छोटे - मोठे किल्ले जिंकून "मराठा साम्राज्य " याची स्थापना केली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊन अवघ्या 12 दिवसांनी राजमाता जिजाबाई यांनी १६७४ च्या रोजी अखेरचा श्वास घेतला.  

राजमाता जिजाऊ मधील तीव्र तळमळ, श्रद्धा, दृढ निश्चय, संयम, धर्माप्रती आदराची भावना, नि: स्वार्थीपणा, चाणाक्ष बुद्धी, योद्धा वृत्ती, व्यापक विचार सरणी, निर्भयता, नेतृत्व, धैर्य, युद्ध नीती, चातुर्य, त्याग करण्याची वृत्ती तसेच, इच्छा शक्ती असे बहुआयामी गुण होते. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती (Rajmata Jijau Jayanti) निमित्त समाजातील सर्व महिला मध्ये या क्षमता विकसित व्हाव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

🚩 जय जिजाऊ, 🚩 जय शिवराय. 🚩

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)