'मे' महिन्यात होणार शिक्षकांच्या बदल्या मार्च पासून प्रक्रियेलासुरुवात -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे रखडलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मार्च २०२२पासून सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे रखडलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया येत्या मार्चपासून राबविण्यात येणार असून, मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांची बदली प्रक्रिया होईल. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी दिली.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या व जिल्हाअंतर्गत बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.
तसेच आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकांची सेवा खंडीत न करता मूळ सेवा बदली, पदोन्नतीसाठी सलग ग्राह्य धरावी, बदल्यांचे कार्यमुक्ती आदेश मुख्याध्यापकांच्या लॉग इनवर उपलब्ध करावेत, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या अंतर्गत आंतरजिल्हा बदली झालेली असल्यास 30 किलोमीटरच्या आत शाळा देण्यात यावी, बदलीसाठीची 30 जून ग्राह्य धरावी, शाळेत मोफत वीज देण्यात यावी, रॅन्डम राऊंडमध्ये विस्थापित व गैरसोय झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा या मागण्या या वेळी निवेदनाद्वारे ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, अवर सचिव सुनील हंजे, रवींद्र गिरी, उपसचिव विजय चांदेकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष नीलेश देशमुख, विभागीय सरचिटणीस दीपक परचंडे, जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी दिली.