भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार (तमिळ) (22 डिसेंबर 1887 - 26 एप्रिल 1920) हे एक महान आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या शास्त्र क्षेत्रात मोठे योगदान दिले. आपल्या प्रतिभेने आणि समर्पणाने त्यांनी गणिताच्या क्षेत्रात केवळ अद्भुत शोध लावले नाहीत तर भारताला अतुलनीय वैभव मिळवून दिले.म्हणून हा 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने " निपुण भारत अभियान " अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी व शिक्षकांसाठी " गणितोत्सवाचे " आयोजन करण्याबाबत शासन निर्णय GR काढला आहे. उपरोक्त विषयाप्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा विडिओ 2 ते 3 मिनीटापर्यंतचा सुस्पष्ट विडिओ,फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमांवर
instagram & facebook , #Mathematicsday2021, #Ganitotsav #Nipunbharatabhiyan #FLN या HASHTAG (#) चा वापर करून विडिओ,फोटो,व इतर साहित्य पोस्ट आपलोड करावी. अधिक महितीसाठी GR DOWNLOAD करा.