पेन्शन दिंडी च्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्या नंतर शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचारी आता विधान भवनावर धडकणार आहेत.2005 नंतर शासकीय सेवेत आलेले कर्मचारी मागिल आनेक वर्षापासून जुनी पेन्शन मिळावी यासाठी लढा देत असलेली म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आनेक आंदोलन मोर्चे काढले परंतु आता पेन्शन चा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. यासाठी 21 डिसेंबर रोजी हजारो कर्मचारी पडघा येथे जमा होऊन विधान भवनावर पायी पेन्शन दिंडी काढणार आहेत. राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबतच्या धोरणविरुद्ध सर्व शासकीय, निमशासकीय संघटना कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, ग्रामसेवक, तलाठी, लिपीकवर्गीय, चतुर्थश्रेणी आणि इतर संवर्गीय पदाच्या कर्मचारी संघटना एकत्र येऊन मुंबईत विधान भवनावर मोर्चा काढणार आहे.
हिवाळी अधिवेशन नागपुर येथे होते त्यामुळे सेवाग्राम ते नागपुर विधानभवन "पायी पेन्शन मार्च" काढण्यात येणार होता. मात्र हिवाळी अधिवेशन आता 22 डिसेंबर पासून मुंबई येथे घोषित झाल्यामुळे "पायी पेन्शन मार्च" आता नाशिक - मुंबई महामार्गावरील पडघा येथून विधानभवनावर धडकणार आहे. हे आंदोलन शांततापूर्वक मार्गाने केले जाणार असून कोव्हिड- 19 च्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे,या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन जुनी पेन्शन मिळावी या लढ्यात आपण योगदान द्यावे अशे आवाहन पालघर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.