नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच 2 l Navodaya Exam Practice Question Paper Set 2
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच 2 I Navodaya Exam Practice Question Paper Set 2
नवोदय प्रवेश परीक्षा 2022-23 चे अर्ज भरा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.
ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI (2022-23)
अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- 30/ 11/ 2021
नवोदय प्रवेश परीक्षेची तारीख :- 30 एप्रिल 2022
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.
नवोदय परीक्षा (इयत्ता – ६ वी ) | Navodaya Pariksha (Class – 6th)
नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो ?
5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते*
प्रत्येक जिल्ह्यातून किती विद्यार्थ्याची निवड होते ?
प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते
ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे
*संपूर्ण मोफत शिक्षण असते .परीक्षा पद्धती
* परीक्षा प्रत्येक तालुकास्तरावर होते.
* एकूण गुण – 100
* एकूण प्रश्न संख्या – 80
* प्रत्येक प्रश्न – 1.25 गुणासाठी.
*परीक्षा वेळ – 2 तास.
* विषय व गुण
* मानसिक क्षमता – 40 प्रश्न
“10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात. “
* अंकगणित – 20 प्रश्न
” एकूण 15 घटक आहेत . काठिण्यपातळीत थोडी वाढ करण्यात आली आहे. “
* मराठी / प्रथम भाषा. – 20 प्रश्न
” एकूण 4 उतारे असतात. प्रत्येक उतारावरील 5 प्रश्न विचारली जातात. “
अभ्यास कसा करावा
1) मानसिक क्षमता चाचणी
संपूर्ण 40 प्रश्न आकृत्या वरील आधारीत असून जास्तीतजास्त सराव करणे गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 गुण मिळवता येतात.2) अंकगणित
15 ते 16 घटक असून गणितात पैकी च्या पैकी गुण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे.
2019 व 2020 चे झालेले पेपर्स पहा.
काठिण्य पातळी लक्षात घेऊन तशा प्रश्न चा सराव करून घ्यावे .
3) भाषा
एकूण 4उतारे असून या साठी आपणास जास्तीत जास्त वाचन …उतारे…लेख…नविनविन बालसाहित्य लेख. वाचन करणे आवश्यक आहे
विद्यार्थ्यांचे समानार्थी शब्द / विरूद्धार्थी शब्द व शब्द संपत्ती चांगली असेल तर 20 पैकी 20 गुण सहज मिळवता येतात.
किती गुण आवश्यक आहेत निवड होण्यासाठी
बुद्धिमत्ता 40 प्रश्न बरोबर यावे
मराठीत 20 प्रश्न यावे.
गणित 18 प्रश्न बरोबर …
म्हणजे आपली निवड निश्चित समजा.
80 प्रश्न पैकी किमाण 76 प्रश्न बरोबर आले तरच निवड निश्चित.