" १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ ( भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातर्फे राज्य सरकार )

Rajan garud
0

" 100 दिवसांकरिता वाचन अभियान " 

१ जानेवारी २०२२ ते एप्रिल 2022  ( भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातर्फे राज्य सरकार )



 " पायाभूत साक्षरता ही आजीवन शिक्षणाची एक आवश्यक पूर्वअट आहे." पायाभूत साक्षरता प्राप्तीसाठी वाचन सवय ही एक महत्त्वाची बाब आहे, म्हणून जिज्ञासू,कल्पक, उत्साही व सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवय विकसित होणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 या कालावधीत 100 दिवसांकरिता वाचन अभियान राबविण्यात येणार आहे.



 या अभियानांतर्गत 100 दिवसांकरिता या पत्रासोबत आठवडानिहाय उपक्रमाचे नियोजन सुद्धा देण्यात आलेले आहे. दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमांची आठवड्यानिहाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. या रचनांचे संचलन सुकर करण्याकरिता आवश्यक संदर्भसाहित्य / स्त्रोत हे शाळा,घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे. तसेच शाळा बंद असलेल्या स्थितीत करायच्या कृतीही  देण्यात आल्या आहेत. अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचनाही पत्रासोबत देण्यात येत आहेत.




 सदर विषयाच्या अनुषंगाने खालील सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी. 

१)  १०० दिवसांकरिता वाचन अभियान या कार्यक्रमाची दिनांक १ जानेवारीपासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी.

२) सर्व पर्यवेक्षक यंत्रणांनी अभियानाच्या जनजागृती करिता प्रयत्नशील रहावे.

३) प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे  सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेची सण नियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे.

४) अभियानातील विविध उपक्रमांबाबत अहवाल तयार करण्यात यावा. तसेच नोडल अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडिओ तयार करून तसेच क्षणचित्रे निवडून लिंकमध्ये अपलोड करावे. याबाबत ची लिंक स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

५)  या वाचन अभियान उपक्रमाच्या सोशल मीडियावरील प्रसारासाठी पुढील हॅशटॅग वापरण्यात यावा.

#100days_Reading_Campaign
#Padhe_Bharat


 तरी १ जानेवारी २०२२ पासून सोबत जोडलेल्या नियोजनानुसार व सूचनांनुसार आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या तसेच माध्यमाच्या शाळांमध्ये अभियानाची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी.

इयत्ता १ ली ते २ री इयत्तानिहाय उपक्रम नियोजन " १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ download

इयत्ता ३ री ते ५ वी इयत्तानिहाय उपक्रम नियोजन " १०० दिवसांकरिता वाचन अभियान "१ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ download

इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तानिहाय उपक्रम नियोजन " १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ download

" १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२  ( भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातर्फे राज्य सरकार ) परिपत्रक 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)