अभिमान भारतीयांचा - नासाने या ९ ग्रहांना दिली आहेत भारतीयांची नावं...
भारतीय व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टींमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. बुद्धिमतेसाठी तर आपल्या भारतीय लोकांची सगळीकडेच वाहवा होते.
जगातील जवळपास सर्वच गोष्टींमध्ये भारतीय कौशल्य प्रकर्षाने जाणवते. तर अशा बुद्धिमान आणि प्रतिभावंत भारतीयांचा वेळोवेळी यथोचित गौरव देखील करण्यात आला आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा काही भारतीय व्यक्तींबद्दल सांगणार आहोत, ज्यांची कामगिरी या तोडीची आहे की त्यांची नावे थेट अवकाशातील ग्रहांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे .
१. विश्वनाथन आनंद...
मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मुख्य कक्षेत असलेल्या छोट्या ग्रहाला ‘४५३८ विश्यानंद’ हे नाव देण्यात आलं आहे.
बुद्धिबळामधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या विश्वनाथन आनंद यांच्या नावावरून या ग्रहाचं नामकरण करण्यात आलं आहे.
२. माधव पाठक...
माधव पाठक हे नाव तेव्हा चर्चेत आले जेव्हा त्याने अंधांच्या ब्रेल लिपी मध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला,
त्याच्या याच कामगिरीमुळे एका ग्रहाला १२५०९ पाठक असे नाव देवून त्याचा सन्मान करण्यात आला.
३. अक्षत सिंघल...
अक्षत सिंघल याने अशी सिस्टम विकसित केली, जी कागदपत्रांचे आपोआप वर्गीकरण करते आणि दोन कागदपत्रांमधील संबंध शोधून काढते.
त्याची ही कामगिरी व्यावसायिक क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरली, म्हणून त्याच्या नावावर १२५९९ सिंघल हे नाव एका ग्रहाला देण्यात आले आहे.
४. हेतल वैष्णव...
हेतल वैष्णव हिने खूप मेहनत घेऊन पॅकिंगसाठी नवीन नाविन्यपूर्ण मटेरियल तयार केले आहे.
हे मटेरियल तिने बहुस्तरीय धातूच्या प्लास्टिकने बनवले आहे.
तिच्या नावावर एका लहानग्या ग्रहाला २५६३६ वैष्णव हे नाव देण्यात आले आहे.
५. डेब्राघ्य सरकार...
डेब्राघ्य सरकार आणि अनीश मुखर्जी दोन्ही वर्गमित्र होते. ते १६ वर्षाचे असताना त्यांनी ऑटो डिस्पोजेबल इंजेक्शन तयार केले.
या कामगिरीसाठी डेब्राघ्यच्या नावावरून एका ग्रहाला २५६३० सरकार हे नाव देण्यात आले आहे.
६. अनिश मुखर्जी...
हा अनिश मुखर्जी म्हणजे वरील डेब्राघ्य सरकार याचाच वर्गमित्र!
त्या दोघांच्या कामगिरीचा स्वतंत्र गौरव करण्यात आला आणि दोघांच्या नावे दोन वेगवेगळ्या ग्रहांना नावे देण्यात आली.
अनिशच्या नावावर एका ग्रहाला २५६२९ मुखर्जी हे नाव देण्यात आले आहे.
७. विष्णू जयप्रकाश...
२०१० मध्ये विष्णू जयप्रकाश याने बारावीमध्ये असताना microbial fuel cell ची संकल्पना जगासमोर आणली. तेव्हाच्या वर्षीचा हा सर्वात मोठा शोध होता.
त्याच्या याच कामगिरीची दखल घेत नव्याने शोधण्यात आलेल्या एका ग्रहाला २५६२० जयप्रकाश हे नाव देण्यात आले.
८. सैनुदेन पट्टाझे...
सैनुदेन हे केरळमध्ये प्राणिशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी पर्यावरण संशोधनामध्ये महान योगदान दिले आहे.
ते नेहमी एसिड रेन, मोबाईल टॉवर्समुळे शरीरावर होणारा दुष्परिणाम, मच्छरांवर जैविक नियंत्रण आणि झाडांचे पर्यावरणासाठी असलेले महत्त्व याबद्दल माहिती देत असतात.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नासाने त्यांच्या नावावरून एका ग्रहाला ५१७८ NO CD4 हे नाव देण्याचे ठरवले.
९. हमसा पद्मनाभन...
हम्सा पद्मनाभन ही एक पुणेकर महाराष्ट्रीयन मुलगी तीही केवळ सोळा वर्षांची,
तिच्या नावावरून एक ग्रहाला नाव देण्यात आले आहे. तिने केलेली संशोधनाची दखल घेत हमसाच्या नावावरून एका ग्रहाला २१५७५ हमसा हे नाव देण्यात आले.
असे आहेत हे तुम्हा-आम्हाला माहित नसलेले पण भारताचे आणि स्वत:चे नाव अवकाशात नेणारे भारतीय!
त्यांचा आम्हाला अभिमान आहे.
🙏🇮🇳🙏