भारतीय संविधान निबंध मराठी | 26 November Sanvidhan Nibandh Marathi

Rajan garud
0

 भारतीय संविधान  निबंध मराठी | 26 November Sanvidhan  Nibandh



भारत देशासाठी जो राष्ट्रीय कायदा तयार करण्यात आला त्याला राष्ट्रीय संविधान असे ओळखले जाते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान समितीचे अधिकृत संविधानाला आपल्या देशाचे संविधान म्हणून स्वीकार केले.

 

आणि हा कायदा 26 जानेवारी 1950 रोजी पासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असे देखील म्हणतात.


ज्या दिवशी आपल्या भारताचे संविधान तयार करण्यात आले तो दिवस म्हणजेच 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान समितीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट 1947 ला संविधान मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

 

जवळपास दोन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर अखेरीस 26 नोव्हेंबर 1950 ला करण्यात आले व संविधान मसुदा समितीमध्ये तयार केलेल्या संविधानाला प्रस्तावित करण्यात आले. यानंतर दोन महिन्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संविधान पारित करण्यात आले व आपला भारत देश एक प्रजासत्ताक देश बनला.

 

भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते. भारताचे संविधान हे हस्तलिखित स्वरूपामध्ये पाहायला मिळते. भारतीय संविधानाची 1 इंग्रजी, 1 मराठी अशी आवृत्ती उपलब्ध आहे.. भारतीय संविधानामध्ये एकूण 48 आर्टिकल्स किंवा ओळी पाहायला मिळतात. भारतीय संविधान पूर्णता लिहिण्यासाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले.


स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच 2015 पासून हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

 

2015 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या स्मरणार्थ संविधान दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले आणि त्यानुसार आजपर्यंत 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

 

भारताची राज्यघटना म्हणजेच आपले संविधान हे भारत देशाचा पायाभूत कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. ज्यांनी आपल्या देशाला संघटित आणि एकत्रित करण्यासाठी व प्रजासत्ता करण्यासाठी हे संविधान लिहिले. तसेच आपल्या देशाचा कायदा आणि संघटन ही एक सूत्राने चालावे यासाठी आपल्या देशाचे संविधान खूप महत्त्वाचे ठरते.

 

1950 साली अंमलात आणलेले हे संविधान 1935 च्या भारतीय कायद्यावर आधारित आहेत.

 

नागरिकत्व, निवडणूका आणि अंतरिम संसदे विषयी आणि इतर काही तात्पुरत्या बाबी या संविधानानुसार लागू झाल्या. आणि या बाबी 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान रूपाने संपूर्ण देशभरात लागू झाल्या व आपल्या देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक प्राप्त झाले.


भारताचे संविधान उद्देशिका मुख्य भाग व 12 पुरवण्या अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांचे अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.

 

सुरुवातीच्या काळातील 395 कलम आन पैकी काही कलमे आता कालबाह्य केलेली आहेत. सध्या भारतीय संविधानामध्ये 448 कलमे असून भारतीय संविधान जगभरातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते.


 

भारतीय संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक हक्क, शोषणविरोधी चा हक्क हे मूलभूत हक्क संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले आहे.

 

त्याच बरोबर संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय प्रतिकांचा मान राखणे, त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, देशाचे अखंडत्व कायम राखणे, देशाचेज सार्वभौमत्व कायम राखणे, मग त्याची काळजी घेणे हे देखील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

 

आपल्या हक्कांची सोबत आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा भारताचे संविधान आहे सर्वोत्कृष्ट मानले जाते.

 

त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो. तसेच भारताच्या संविधान दिनानिमित्त भारतात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.


 

मुख्यता हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आणि इतर शासकीय प्रशासनाने व ठिकाणी‌ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते की वकृत्व स्पर्धा, भाषण, चित्रकला, डान्स अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

 

सरकारच्या निर्देशानुसार, कॉलेज, युनिव्हर्सिटी मध्ये माॅक पार्लमेंट डेबिट घेतल्या जातात.

 

आपल्या देशामध्ये चुकाही काय चालू आहे तो या संविधानानुसार चालू आहे त्यामुळे आपली युवा पिढी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या संविधानाचा सखोल अभ्यास करायला हवा.

 

संविधानानुसार प्राप्त झालेले हक्क आणि जबाबदार्या जाणून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि संविधानानुसार दिलेल्या सर्व कायद्यानुसार वागणे हे आपले प्राथमिक कर्तव्य मानले पाहिजे. व सदैव आपल्या संविधानाचा सन्मान आणि अभिमान केला पाहिजे.


जय भारत ! जय संविधान  !

 









टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)