लाल बहादुर शास्त्री मराठी माहिती, निबंध | lal bahadur shastri information in marathi
प्रारंभिक जीवन- lal bahadur shastri mahiti marathi
भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 ला उत्तर प्रदेश मधील मुगलसराय मध्ये झाला आहे. या काळात भारतावर इंग्रजांचे शासन होते. लालबहादूर शास्त्री यांचे वास्तविक नाव लालबहादूर श्रीवास्तव होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव मुंशी शारदाप्रसाद श्रीवास्तव होते, त्यांचे वडील प्राथमिक शाळेत एक शिक्षक होते. शास्त्रींच्या आईचे नाव रामदुलारी होते. शास्त्री 18 महिन्याचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. ज्यामुळे त्यांची आई त्यांना सोबत घेऊन आपले वडील हजारीलाल यांच्या घरी मिर्झापूर येथे येऊन गेली.
लाल बहादुर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण मिर्जापुर मध्ये झाले. या नंतरचे शिक्षण त्यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून केले. त्यांनी काशी विद्यापीठातून संस्कृत भाषेत ग्रॅज्युएशन पूर्ण करून 'शास्त्री' ही उपाधी प्राप्त केली. व नंतर त्यांनी जन्मापासून सोबत असलेले जाति सूचक आडनाव 'श्रीवास्तव' काढून 'शास्त्री' धारण केले.
लालबहादूर शास्त्री विवाह
1928 मध्ये त्यांचा विवाह मिर्झापूर मधील गणेश प्रसाद यांची मुलगी ललिता देवीशी झाला. ललिता व शास्त्री यांचे 6 अपत्य झाले. ज्यात 2 मुली आणि 4 मुले आहेत.
लाल बहादूर शास्त्री चे भारतीय स्वतंत्र युद्धातील कार्य
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शास्त्रींनी 'मरो नही मारो' ची घोषणा दिली. ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला तीव्र केली. शास्त्री महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित एक गांधीवादी नेता होते. त्यांनी सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. त्यांनी 1921 मधील असहयोग आंदोलन, 1930 मध्ये दांडी यात्रा व 1942 मधील भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.
द्वितीय विश्व युद्धादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज चे गठण करून दिल्ली चलो चा नारा दिला. याच दरम्यान गांधीजींच्या भारत छोड़ो आंदोलनाने तीव्रता धरली. लाल बहादूर शास्त्रीं यांनी भारतीयांना जागृत करण्यासाठी 8 ऑगस्ट 1942 ला करो या मरो चा नारा दिला. परंतु 9 ऑगस्ट 1942 ला त्यांनी आपला नारा बदलून मरो नही मारो ची घोषणा केली. या आंदोलनादरम्यान लाल बहादूर शास्त्रीना 19 ऑगस्ट 1942 ला अटक करण्यात आली.
लाल बहादूर शास्त्री चे राजनैतिक कार्य
भारताच्या स्वातंत्र्यानंतर लालबहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशच्या संसद चे सचिव बनवण्यात आले. 1947 मध्येच त्यांना पोलिस आणि वाहतूक परिवहन मत्रीही बनवण्यात आले. त्यांनी पहिल्यांदा बस मध्ये महिला कंडक्टर ची नियुक्ती केली होती.
1964 मध्ये त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. त्यांनी दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी श्वेत क्रांती ला प्रोत्साहन दिले. भारतात खाद्यपदार्थ वाढवण्यासाठी 'हरित क्रांतीला' ही प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यकाळात 1965 मध्ये भारताने पाकिस्तान सोबत एक आक्रमकता चा सामना केला. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यासाठी सेनेला स्वतंत्रता दिली आणि देशात अधिक लोकप्रियता मिळवली. 23 सप्टेंबर 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध समाप्त झाले.
लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू
10 जानेवारी 1966 ला रशिया आणि अमेरिका च्या दबावाखाली लाल बहादूर शास्त्री भारत-पाकिस्तान शांती करारावर स्वाक्षरी करण्यास तयार झाले. पाकिस्तान चे राष्ट्रपती अयुब खान आणि भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची भेट रशियातील ताश्कंद मध्ये झाली. असे म्हटले जाते की त्यांच्यावर दबाव टाकून हस्ताक्षर करण्यास सांगितले गेले. 11 जानेवारी 1966 मध्ये कराराच्या रात्री अतिशय रहस्यपूर्ण पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी सांगण्यात आले की त्यांची मृत्यू हृदयविकाराने झाली. परंतु त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही.
असेही म्हटले जाते की लालबहादूर शास्त्री यांच्या भोजनात विष मिळवण्यात आले होते. परंतु पाकिस्तान, अमेरिका आणि रशिया यांच्या भीतीने भारताने त्या वेळी कोणतीही विरुद्ध कारवाई केली नाही. शास्त्री यांचा शासन काळ 18 महिन्याचा होता, त्यांच्या मृत्यू नंतर गुलजारी लाल नंदा यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. लाल बहादूर शास्त्री यांना मृत्यू नंतर 1966 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात आला. शास्त्री एक महान, निष्ठावान आणि सक्षम व्यक्तीचा रूपात ओळखले जातात. ते महान आंतरिक शक्ती सोबत,, विनम्र, सहनशील व्यक्ती होते.
अधिक शैक्षणिक video पाहा.