लाल बहादुर शास्त्री जयंती मराठी भाषण | lal bahadur shastri bhashan marathi

Rajan garud
0

 





लाल बहादुर शास्त्री भाषण मराठी lal bahadur shastri speech in marathi

आदरणीय सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या या कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे. 


माझे नाव मोहित पाटील आहे व येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या शुभ दिवशी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषण देण्याची संधी मिळाल्याने मी स्वतः ला खूप भाग्यवान समजत आहे आणि मला अशा आहे की मी माझ्या या भाषणातून सर्वांना लाल बहादुर शास्त्री च्या कार्याबद्दल माहिती देऊ शकेल. 


लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 ला ब्रिटिश काळात उत्तर प्रदेशातील मुघलसराय मध्ये झाला होता. ते पंडित जवाहरलाल नेहरू नंतर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. लाल बहादूर शास्त्री गांधीजींच्या साहस व अहिंसेच्या विचारांनी प्रभावित होते. लाल बहादूर शास्त्री यांचे वडील मुशी शारदाप्रसाद श्रीवास्तव एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव रामदुलारी होते. शास्त्री च्या जन्माच्या 18 महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ज्यामुळे त्यांच्या आई त्यांना घेऊन आपल्या माहेरी आल्या. 


लाल बहादूर शास्त्री यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. येथूनच त्यांनी संस्कृत भाषेत ग्रॅज्युएशन पूर्ण करून 'शास्त्री' ही उपाधी धारण केली.  


भारताच्या स्वतंत्र युद्धात लाल बहादूर शास्त्री यांनी "मरो नाही मारो" ची घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला तीव्र झाली. शास्त्री यांनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. 1921 मधील असहयोग आंदोलन, 1930 मधील दांडी यात्रा व 1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारत छोडो आंदोलनात इतर नेत्यांसोबत लाल बहादूर शास्त्री यांनाही इंग्रजांनी अटक केली. 


भारताच्या स्वातंत्र्यानंतर लालबहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशच्या संसद चे सचिव बनवण्यात आले. 1947 मध्येच त्यांना पोलिस आणि वाहतूक परिवहन मत्रीही बनवण्यात आले. त्यांनी पहिल्यांदा बस मध्ये महिला कंडक्टर ची नियुक्ती केली होती. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू च्या मृत्युनंतर त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. त्यांनी दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी श्वेत क्रांती ला प्रोत्साहन दिले. भारतात खाद्यपदार्थ वाढवण्यासाठी 'हरित क्रांतीला' ही प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यकाळात 1965 मध्ये भारताने पाकिस्तान सोबत एक आक्रमकता चा सामना केला. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यासाठी सेनेला स्वतंत्रता दिली आणि देशात अधिक लोकप्रियता मिळवली. 23 सप्टेंबर 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध समाप्त झाले. 


10 जानेवारी 1966 ला रशिया आणि अमेरिका च्या दबावाखाली लाल बहादूर शास्त्री भारत-पाकिस्तान शांती करारावर स्वाक्षरी करण्यास तयार झाले. पाकिस्तान चे राष्ट्रपती अयुब खान आणि भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची भेट रशियातील ताश्कंद मध्ये झाली. असे म्हटले जाते की त्यांच्यावर दबाव टाकून हस्ताक्षर करण्यास सांगितले गेले. 11 जानेवारी 1966 मध्ये कराराच्या रात्री अतिशय रहस्यपूर्ण पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी सांगण्यात आले की त्यांची मृत्यू हृदयविकाराने झाली. परंतु त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. 


लाल बहादूर शास्त्री यांनी निस्वार्थ पणे देशाची सेवा केली. चला आज आपण सर्व मिळून लाल बहादूर शास्त्री या महान आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करू. आज आवश्यकता आहे की आपल्या देशातील सर्व नेत्यानि लाल बहादूर शास्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे. असे केल्यास देशाला प्रगतीपथावर पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही. आपण सर्वांनी माझे भाषण शांत चित्ताने ऐकून घेतले त्या बद्दल धन्यवाद.  जय हिंद जय भारत.


अधिक शैक्षणिक video पाहा.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)