पहिल्याच दिवशी शाळेत साजरा करूया शिक्षणोत्सव - मा.शालेय शिक्षणमंत्र्यांची सूचना

Rajan garud
0

 





शिक्षणोत्सव साजरा करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना/तात्काळ कार्यवाहीसाठी:

       आज रोजी मा.मंत्री महोदया प्रा.वर्षा गायकवाड मॅडम,आयुक्त(शिक्षण) मा.श्री.विशाल सोळंकी साहेब,शिक्षण सहसंचालक मा.श्री.टेमकर साहेब यांच्या उपस्थितीत शाळापूर्व तयारी साठी V.C. आयोजित करण्यात आली होती.

सदर V.C.तील ठळक महत्त्वाच्या बाबी....

1)ज्या ठिकाणी अगोदरच शाळा सुरू झाल्या आहेत त्या ठिकाणची विद्यार्थी उपस्थिती वाढविणे गरजेचे आहे. 

2)100 टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक राहील. 

3)सोमवार पासून सुरू होणाऱ्या शाळांच्या भेटींचे नियोजन करावे. पर्यवेक्षण यंत्रणेतील सर्व घटकांनी किमान 02 शाळा भेटी कराव्यात. उद्या,दि.3 ऑक्टोबर पर्यंत सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी नियोजन जिल्हा कार्यालयास सादर करावे.  

4)शिक्षकांच्या लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती द्यावी.किती शिक्षकांनी लस घेतली व किती बाकी राहिले? याची माहिती घेऊन 100% लसीकरण व्हावे याकरिता councelling करण्यात यावे. 


                                          

सध्या गाजलेले  'चला मुलांनो चला  ' चे आनंददायी गीत 




5)एकही डोस पूर्ण न झालेल्या शिक्षकांना प्राधान्याने लस द्यावी. त्याबाबत नियोजन करावे. 

6)1 ते 4 शाळा सुरू करण्यासाठी शासन स्तरावरून परवानगी नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर असेल.तथापि मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शिक्षकांनी ऑनलाइन पध्दतीने मुलांचे शिक्षण चालू कसे राहील यासाठी प्रयत्न करावेत.

7) सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश लवकर द्यावेत.

8)सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली की नाही याबाबत खात्री करावी. 

9)ज्या विद्यार्थ्यांना अद्याप पाठयपुस्तके मिळाली नाहीत त्यांना शाळा सुरू होण्याच्या दिवशी वाटप करावेत.पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचे फोटो काढावेत आणि शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.

10)4 ऑक्टोबरला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सर्व शाळांमध्ये घेण्यात यावा.फोटो दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.

11) 'माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी' हा 4 तारखेला 12:00 वाजता प्रसारित होणार्या शासकीय कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा.

12)स्थानिक ठिकाणी येणाऱ्या अडचणी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्राधिकरणाने निर्णय घेऊन सोडवावेत.यासाठी राज्य स्तरावरून कोणतेही निर्देश मिळणार नाहीत. 

13)दिवाळीपर्यंत निवासी शाळा सुरू होणार नाहीत.

14)कोविड च्या सर्व नियमांचे पालन करुन शा.व्य.समितीच्या सहमतीने शाळा 5 ते 12 ग्रामीण व 8 ते 12 शहरी सुरू करावी.





 🔰      दि.०४/१०/२०२१ रोजी शाळा सुरु करतेवेळी प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणोत्सव साजरा  करावा. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारीक स्वागत करावे जेणेकरुन शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मिती होईल.


🔰 दि. ०४/१०/२०२१ रोजी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी,वरिष्ठ,अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख विषय सहाय्यक इ.) शाळा भेटींचे नियोजन करण्यात यावे व करण्यात आलेल्या नियोजनाची एक प्रत प्राथमिक / माध्यमिक शिक्षण संचालनालयास सादर करावी.


🔰सदर अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या शाळा भेटीचे फोटो, व्हिडीओ आपल्या अथवा आपल्या सहकाऱ्याच्या फेसबुक/ इन्स्टाग्राम / द्विटर या पैकी एका अथवा सर्व समाजमाध्यमावर पोस्ट करावेत. पोस्ट सोबत आपले नाव, पद, जिल्हा, तालुका, भेट दिलेल्या शाळेचे नाव, यु डायस क्रमांक, भेटीचा दिनांक व वेळ यांचा लिखित (टेक्स्ट) तपशील देखील अपलोड करावा. 


🔰 सदर पोस्ट वरील प्रमाणे फेसबुक / इन्स्टाग्राम / ट्विटर या समाज माध्यमावर पोस्ट करताना ती Public असावी. तसेच फेसबुक वर पोस्ट करत असताना ती Story मध्ये शेअर न करता Wall वर शेअर करण्यात यावी.


🔰 भेटीच्या फोटोसोबत आपण आपल्या भेटीचा / शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करत असल्यास तो जास्तीत जास्त २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा तसेच फोटो व व्हिडीओ सुस्पष्ट असेल याची काळजी घ्यावी.


🔰 उपरोक्त प्रमाणे समाजमाध्यमावर पोस्ट करत असताना दिलेल्या #M/MJ२०२१. #शिक्षणोत्सव या #HASHTAG चा वापर करावा.

🔰 तसेच समाजमाध्यमांवर पोस्ट करत असताना सदर पोस्ट खालीलप्रमाणे टॅग करून अपलोड करण्यात यावेत

           

 (१) फेसबुक - @SCERT, Maharashtra @thxteacher,

(२) ट्विटर वर @scertmaha @thxteacher

(३)इंस्टाग्रामवर @scertmaha @thankuteacher


🔰 समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत असताना आपण लिहिलेला तपशील, सर्व # व टॅग पूर्ण केले आहेत व आपण अपलोड करत असलेले फोटो सुस्पष्ट आहेत याची तपासणी करून व पोस्ट Public असावी याची काळजी घेऊन पोस्ट करावेत.


🔰 आपली पोस्ट उपरोक्त नमूद ३.२ ते ३.६ मध्ये देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे अपलोड करण्यात यावेत.


🔰 शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे व त्याचे देखील फोटो ३.२ ते ३.६ मध्ये देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे अपलोड करण्यात यावेत.

वरील  सुचनेचे परिपत्रक डाऊनलोड करा.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)