जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा येथे जागतिक हात धुवा सप्ताह उत्साहात संपन्न
15 ऑक्टोबर 2021 ते 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा येथे जागतिक हात धुवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .
covid-19 च्या काळामध्ये हाताच्या स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन शाळाप्रमुख सौ .शिल्पा बळवंत वनमाळी मॅडम व शाळेचे उपशिक्षक श्री. नागनाथ भोसले व श्रीम. अंसू सिंह मॅडम यांनी संपूर्ण सप्ताहात घ्यावयाच्या उपक्रमांचे नियोजन केले .
कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून या उपक्रमाची अंमलबजावणी शाळापातळीवर करण्यात आली .
शाळेमध्ये हात धुण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले .विद्यार्थ्यांना हात धुण्याचे गीत शिकवून त्यांच्याकडून या सर्व कृती करून घेण्यात आल्या. गावामध्ये स्वच्छता फेरीचे आयोजन करण्यात आले. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थी व शिक्षकांनी हात धुण्याच्या प्रात्यक्षिक गावकऱ्यांना करून दाखवले . हात कोणकोणत्या वेळी धुवावेत आणि तसेच स्वच्छ हातमुळे होणारे फायदे याबद्दल माहिती सांगितली.
गावकऱ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साबण मदत म्हणून देण्याचे आवाहन सौ. शिल्पा वनमाळी मॅडम यांनी केले त्यावेळेस गावातील दुकानदार ,ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांसाठी साबण भेट म्हणून दिले .
स्वच्छ हात धुण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कृतीद्वारे लक्षात येण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
विद्यार्थ्यांनी टाकाऊ बाटल्यापासून टिकाऊ हॅन्डवॉश स्टेशन बनवून अतिशय उत्साहात जागतिक हात धुवा सप्ताह साजरा केला
सावटे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .महेश वर्तक सर यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले .