जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा ,केंद्र:- सावटे ,तालुका:- डहाणू ,शाळेला दि 9 ऑक्टोबर 2021 ,शनिवार रोजी ग्राममंगल ऐना ,येथे पेन्स सहयोग फाउंडेशन यांच्या तर्फे आयोजित इयत्ता 1ली व 2री च्या विद्यार्थ्यांसाठी कोविड 19 काळात वाटप करण्यात आलेल्या ऑफलाइन अभ्यासक्रम किट या उपक्रमात उत्तम प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अखंड ठेऊन त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याच्या कामगिरीचे कौतुक म्हणून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले .
270 पुस्तकांचा किट( अंदाजित रक्कम दहा हजार रुपयांचे )बक्षीस देऊन शाळेचा व शाळेच्या शिक्षकांचा पेन्स सहयोग फाउंडेशनने गौरव केल्याबद्दल श्री .योगेश सावे सर व संपूर्ण टीमचे , शाळाप्रमुख सौ .शिल्पा बळवंत वनमाळी मॅडम आणि उपशिक्षक श्री.नागनाथ भोसले सर यांनी मनःपूर्वक आभार मानले .
पेन सहयोग फाउंडेशनच्या शैक्षणिक वर्ष 2021-2022 गुरुकिल्ली प्रायमरी उपक्रमांतर्गत 170 शाळेतील इयत्ता 1ली व 2री च्या पाच हजार विद्यार्थ्यांना ऑफलाईन अभ्यासक्रम कीट देण्यात आले होते.
कोविड 19 च्या काळात शाळेतील
हा उपक्रम राबवत असताना काही शाळांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला .अशा उपक्रमशील 34 शाळांची निवड केली गेली असून त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले .
यात जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा शाळेला 🥇प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले असून 270 पुस्तकांचा किट( अंदाजित रक्कम दहा हजार रुपयांचे )बक्षीस देऊन शाळेचा व शाळेच्या शिक्षकांचा पेन्स सहयोग फाउंडेशनने गौरव केला
जि .प.शाळा आगवन नवासाखरा शाळेचे व शिक्षकवृंद यांचे हार्दिक अभिनंदन