जाणून घेऊया महात्मा गांधीविषयी
महात्मा गांधींचे प्रारंभिक जीवन
गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली भारताच्या गुजरात राज्यातील पोरबंदर गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री करमचंद उत्तमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई होते. करमचंद गांधी ब्रिटिश भारतातील राजकोट चे मंत्री होते व देशाच्या स्वातंत्र्यात त्यांची देखील महत्त्वाची भूमिका होती. गांधीजींच्या आई पुतळाबाई एक धार्मिक स्त्री होत्या.
मे 1883 मध्ये साडे 13 वर्षाच्या वयात त्यांचा विवाह 14 वर्षाच्या कस्तुरबा गांधी यांच्याशी करण्यात आला. जेव्हा गांधीजी 15 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या प्रथम मुलाने जन्म घेतला. परंतु काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. गांधीजींच्या वडिलांचेही 1885 मध्ये निधन झाले. यानंतर मोहनदास व कस्तुरबा यांना चार मुळे झाली.
गांधीजींचे शिक्षण
गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर तर हायस्कूलचे शिक्षण राजकोटमध्ये पूर्ण झाले. शैक्षणिक स्तरावर गांधीजी एक सामान्य विद्यार्थी होते. सन 1887 मध्ये त्यांनी अहमदाबाद हून मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना लंडन जाऊन बॅरिस्टर होण्याचा सल्ला दिला. 4 सप्टेंबर 1888 ला गांधीजी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मध्ये कायद्याचे शिक्षण घ्यायला गेले. जून 1891 ला तीन वर्षांनी गांधीजी भारतात परत आले.
गांधीजी दक्षिण आफ्रिकेत
भारतात परत आल्यावर गांधीजींना आपल्या आईच्या मृत्यूचा सूचना कळाली. यानंतर त्यांनी मुंबई येथे वकिली चे काम सुरू केले. परंतु वकिली च्या व्यवसायात त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. सन 1893 ला त्यांना दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय केसची वकिली करण्याचा करार मिळाला. 24 वर्षाच्या वयात गांधीजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर भेदभाव केले जात होते. गांधीजींना वंशवाद रंग भेदाचा सामना करावा लागला.
एकदा रेल्वेच्या प्रथम डब्याचे तिकीट असतानाही त्यांना रेल्वेतून बाहेर धक्का देऊन काढून दिले. या घटनेने गांधीजींना सामाजिक अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष करायला प्रेरित केले. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी अवज्ञा आंदोलन सुरू केले. ह्या आंदोलनाच्या पूर्ण झाल्यावर ते भारतात परत आले.
सामाजिक व राजनैतिक कार्य
गांधीजी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले. त्या काळात ते एक प्रसिद्ध रजनेता ओळखले जाऊ लागले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात आपले विचार व्यक्त केले. गांधीजींनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक आंदोलने केली. गांधीजींची ही आंदोलने पुढील प्रमाणे आहेत.
चंपारण व खेडा सत्याग्रह
गांधीजींना प्रथम उपलब्धता चंपारण व खेडा सत्याग्रहा मुळे मिळाली. हे सत्याग्रह ब्रिटिश जमिनमालकां विरुद्ध करण्यात आले. त्या काळात इंग्रजां द्वारे भारतीय शेतकऱ्यांवर नीळ ची शेती करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. भारतीयांना नीळ एका ठराविक किमतीवर विकायला सक्ती केली जात होती. गांधीजींनी याविरुद्ध अहिंसात्मक आंदोलन सुरू केले. याच दरम्यान गुजरातमधील खेडा नावाच्या एका गावात अतिवृष्टी मुळे शेतातील पीक नष्ट झाले. या गावातील लोकांनी गांधीजीच्या सहायतेने आंदोलन सुरू केले. गांधीजींच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात जन प्रतिसाद मिळाला. याचा परिणाम 1981 मध्ये इंग्रज शासनाने टॅक्स संबंधी नियमात कटौती करण्याचे वचन शेतकऱ्यांना दिले.
असहयोग आंदोलन
भारतात होत असलेल्या विविध आंदोलनाना बंद करण्यासाठी इंग्रज शासनाने सन 1919 मध्ये रोलेट अक्ट पास केला. या दरम्यान देशात गांधीजी व इतर नेत्याद्वारे सभा आयोजित करण्यात आल्या. अशीच एक सभा पंजाब च्या अमृतसर मधील जालियनवाला बाग मध्येही बोलावण्यात आली. या शांततेत सुरू असलेल्या सभेवर इंग्रज अधिकाऱ्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 500 पेक्षा जास्त लोक मृत्यू मुखी पडले. या घटनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली. जालियनवाला बाग हत्याकांड च्या विरोधात गांधीजींनी सन 1920 मध्ये असहयोग आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा अर्थ होता की भारतीयांद्वारे इंग्रजांना कोणत्याही पद्धतीने सहकार्य केले जाऊ नये. परंतु हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक होते.
मिठाचा सत्याग्रह
इंग्रजांनी मीठ बनवण्यावर बंदी व कर लावला होता. या विरुद्ध गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात 12 मार्च 1930 ला गुजरात मधील अहमदाबाद शहराजवळ असलेल्या साबरमती आश्रमातून केली आणि ही यात्रा 5 एप्रिल 1930 पर्यंत गुजरात मधील दांडी स्थानापर्यंत पोहचली. येथे पोहचल्यावर गांधीजींनी मीठ बनवले व मिठाचा कायदा मोडला. मिठाच्या या सत्यग्रहात हजारो लोक जुळले होते. भारतात इंग्रजांविरुद्ध झालेल्या आंदोलनामध्ये हे एक महत्त्वाचे आंदोलन होते.
दुसरे महायुध्द आणि भारत छोडो आंदोलन
1940 च्या दशका पर्यंत संपूर्ण भारतीयांमध्ये इंग्रजांविरुद्ध क्रोध निर्माण झाला होता. गांधीजींनी याचा योग्य उपयोग केला. द्वितीय महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारत छोडो आंदोलन (Quit India movement) सुरू केले. हे आंदोलन आजपर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये सर्वात प्रभावी ठरले. या आंदोलनाची सुरुवात 8 ऑगस्ट 1942 ला झाली परंतु याच्या दुसऱ्याच दिवशी गांधीजी इतर भारतीय नेत्यांना इंग्रजांनी अटक केली. जवळपास 2 वर्षे त्यांना बंदिस्त करून ठेवण्यात आले.
जरी भारत छोडो आंदोलनाला यश मिळाले नाही तरी या आंदोलनाने भारतीयांना एकजूट केले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळी इंग्रजांना भारतात सत्ता सांभाळणे कठीण झाले. व त्यांनी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताचे दोन भाग करून दोन स्वतंत्र देश भारत व पाकिस्तान तयार करण्यात आले. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र प्राप्त झाले.
गांधीजींची हत्या
30 जानेवारी 1948 महात्मा गांधी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये एका प्रार्थनेला संबोधित करायला जात होते. संध्याकाळी 05:17 ला नाथूराम गोडसे नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्तीने त्यांच्या छातीत तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केली. असे मानले जाते की महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द ‘हे राम’ असे होते. यानंतर नाथूराम गोडसे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला व 1949 मध्ये त्या सर्वांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली.
अधिक शैक्षणिक video पाहा.