अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 3 अकबर बादशहा आणि पोपट - Akbar Badshah Ani Popat

Rajan garud
0

 अकबर बादशहा आणि पोपट - Akbar Badshah Ani Popat


एकदा, एक गरीब माणूस राजदरबाराला भेट देतो. त्याने त्याच्याबरोबर एक सुंदर पोपट आणलेला असतो. व तो महाराजांपुढे पोपट सादर करतो. महाराजांना तो पोपट खूप आवडला. अकबर तो पोपट आपल्याकडे ठेवून घेतो व त्या माणसाला योग्य ते बक्षिस देऊन दरबारातून जायला सांगतो. 

अकबर तो पोपट एका नोकराकडे देतो व म्हणतो.‘या पोपटाची व्यवस्थित काळजी घे व त्याला वेळोवेळी खाऊ घाल व त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. तो आजारी आहे किंवा मेला आहे अशा प्रकारची कोणतीही बातमी घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. जर तू अशी वाईट बातमी माझ्याकडे घेऊन आलास तर मी तुझे डोके धडापासून कापून वेगळे करेल.’

तो नोकर पोपटाची खरोखरच नीट काळजी घेत असे.

तरीसुध्दा,एके दिवशी तो पोपट आजारी न पडता मेला. हे बघून तो नोकर खूप घाबरला त्याने मनातल्या मनात विचार केली की, ‘जर मी हे सांगायला महाराजांकडे गेलो तर, त्याचवेळी माझा मृत्यू निच्छीत आहे जर मी आत्ता याबद्दल कळविले नाही तरीसुध्दा काही दिवसांनी महाराजांना हे समजेल व माझी शिक्षा ही मृत्यूच असेल. मी आता काय करू?’

त्याला काहीही कळत नव्हते की आता काय करावे. तो नोकर बिरबलकडे गेला व त्याला सर्व काही सांगितले.


बिरबल त्याला म्हणाला काही काळजी करू नको मी स्वतः अकबरशी बोलतो.

‘महाराज तुमचा पोपट.....’ बिरबलने त्याचे वाक्य पूर्ण करण्याच्या आतच.

‘माझा पोपट!’ अकबर बोलला ‘काय झाले त्याच्याबरोबर?’

‘विशेष असे काही नाही महाराज! परंतु तो....’

‘मला एकदा सांग, बिरबल’ अकबर उतावीळपणे बोलला, ‘तो मेला आहे का?’

‘नाही..नाही.. महाराज. तुमचा पोपट तर मोठया संन्यासीमध्ये परिवर्तित झाला, त्याचे आकाशाकडे तोंड आहे व तो डोळे बंद करून पाठीवर झोपला आहे.’

‘मग तू का सांगत नाही, की पोपट मेला आहे म्हणून?’ अकबर बिरबलवर ओरडत म्हणाला.

‘जर तुम्हाला असे बोलणे आवडत असेल तर. तुम्ही बोलू शकता महाराज पण मी कसे बोलू शकतो?’ बिरबल बोलला. ‘कारण मला असे वाटते की तो प्रार्थना करीत आहे.’

‘चल जाऊया आणि त्याला बघूया.’ अकबर बोलला.

बिरबलने पोपटाचा पिंजरा दाखवला. अकबरने बघितले की पोपट मेला आहे.

‘बिरबल तू तर खूप बुध्दीमान आहेस’ अकबर बोलला.

‘परंतु मला तुला बघून आश्चर्य वाटते की तू जिंवत आणि मृत पोपट यांमध्ये फरक ओळखायला सक्षम नाही. पो

पट मेला आहे असे तु मला आधी का सांगितले नाही.’

‘मी असे कसे बोलू शकतो महाराज?’ बिरबल बोलला. ‘तुमचा पोपट मेला आहे असे मी जर तुम्हाला बोललो असतो तर तुम्ही माझे डोके धडापासून वेगळे केले असते.’

आता अकबरला त्याचे शब्द आठवले. पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी नोकरावर सोपवल्यानंतर तो बोलला होता की ‘जर तू माझ्याकडे पोपट मेला आहे अशी बातमी घेऊन आला तर मी तुझे डोके धडापासून वेगळे करेल.’

अकबरने स्मित हास्य केले.

‘अरे बिरबल, तू तर खरोखरच बुध्दीमान आहेस!’ अकबर बोलला.


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 4 - बिरबल सापडला - Birbal Sapadla


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 3 अकबर बादशहा आणि पोपट - Akbar Badshah Ani Popat


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 2  बिरबल काळा कसा झाला - Birbal Kara Kasa Jhala


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)