अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 9 काल आज आणि उदया | kal,aaj ani udya

Rajan garud
0

 



एक दिवस अकबरने घोषणा केली की ‘जो कोणी माझ्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देईल त्याला मोठे बक्षिस देण्यात येईल.’

  1. प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.

    1. असे काय आहे जे आज आहे आणि उदया पण राहील?
    2. असे काय आहे जे आज नाही परंतु उदया असेल?
    3. असे काय आहे जे आज तर आहे परंतु उदया नसणार?
    याबरोबरच या तिन्ही प्रश्नांचे उदाहरण पण दयावे लागेल.
    कोणालाही चतुराईने भरलेल्या तिन्ही प्रश्नांचे उत्तरे सुचत नव्हती. तेव्हा बिरबल बोलला, ‘महाराज! तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकतो परंतु यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर राज्याचा दौरा करण्यासाठी यावे लागेल. तेव्हाच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला देता येतील.

    बादशहा अकबर व बिरबल यांनी वेषांतर केले व साधुचा वेष धारण केला आणि राज्यातील बाजारात गेले. 
    काही वेळानंतर ते बाजारातील एका दुकानात शिरले. बिरबल दुकानदाराला बोलला, ‘आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी मदरसा बनवायचा आहे, तुम्ही आम्हाला यासाठी हजार रूपये दया.

    जेव्हा दुकानदाराने कारकुनाला सांगितले की यांना हजार रूपये दे. तेव्हा बिरबल बोलला जेव्हा मी तुमच्याकडून रूपये घेत राहील तेव्हा तुमच्या डोक्यावर माझा बूट मारेल. प्रत्येक एक रूपयामागे डोक्यावर एक बूट पडेल. तुला हे मान्य आहे का?’

    हे ऐकून दुकानदाराच्या नोकराचा पारा चढला व तो चिडून बिरबलच्या अंगावर धावून आला.
    दुकानदाराने नोकराला शांत रहाण्यास सांगितले व बोलला, ‘मी तयार आहे. परतु माझी एक अट आहे. मी दिलेला पैसा हा चांगल्या कामासाठीच खर्च केला जाईल याची मला खात्री हवी.’

    असे म्हणत दुकानदाराने आपले डोके खाली करत बिरबलला म्हणाला की बूट मारणे चालू करा. तेव्हा बिरबल व अकबर काहीही न बोलता दुकानातून बाहेर निघून आले. दोघेही शांतपणे चालत होते तेव्हा बिरबलने आपले मौन तोडले व बोलला ‘हे प्रभू! दुकानात जे काही घडले त्याचा अर्थ असा आहे की दुकानदाराजवळ आज पैसा आहे आणि त्या पैशाला चांगल्या कामासाठी वापरण्याची त्याची नियत पण आहे, त्यामुळे त्याला उदया (भविष्यात) पण फायदा होईल. याचा अर्थ असा आहे की आपल्या चांगल्या कामामुळे तो स्वर्गात आपली जागा बनवत आहे. आपण याला असेही म्हणू शकता की जे काही त्याच्याकडे आज आहे, ते उदयापण त्याच्याकडे असेल. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे.’

     त्यानंतर ते चालत एका भिकाऱ्याजवळ गेले. त्यांनी बघितले की एक माणूस त्याला काही खायला देत होता आणि ते खाण्याचे सामान त्या भिकाऱ्याच्या गरजेपेक्षा जास्त होते. तेव्हा बिरबल त्या भिकाऱ्याला बोलला, ‘आम्हाला भूक लागली आहे, आम्हाला पण काही खायला दे.’
    हे ऐकून भिकारी ओरडला व बोलला, ‘चालते व्हा येथून, कुठून कुठून येतात मागायला.’

    बिरबल अकबरला बोलला, ‘महाराज हे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. हया भिकाऱ्याला देवाला खुश करणे माहीत नाही. याचा अर्थ असा आहे की याच्याकडे आज जे काही आहे ते उदया नसणार. 

    थोडया वेळानंतर त्यांनी एका सन्यासाला बघितले जो एका झाडाखाली बसून आराधना करीत होता. बिरबलने त्याच्या जवळ जाऊन काही पैसे ठेवले. त्यावर तो सन्यासी बोलला, ‘याला माझ्या समोरून बाजूला करा. माझ्यासाठी हे बेईमानीने मिळविलेले पैसे आहेत असे पैसे मला नकोत.’

    आता बिरबल बोलला, ‘महाराज! याचा अर्थ असा होतो की जे आज नाही परंतु ते उदया असेल. आज हा सन्यासी सर्व सुख सोयींना नाकारात आहे परंतु उदया हे सर्व सुख याच्याजवळ असेल.’

    ‘आणि महाराज! चौथे आणखी एक उदाहरण आहे, तुमच्याबाबतीत. मागच्या जन्मी तुम्ही काही चांगले कर्म केले होते की ज्यामुळे आपले आजचे जीवन सर्व सुख सोयींनी व आनंदात जात आहे. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. जर तुम्ही याच प्रकारे ईमानदारीत व न्यायाने राज्य केले तर उदया पण आपल्याकडे या सर्व सुखसुविधा असतील. परंतु हे विसरू नका की तुम्ही जर चुकीचे निर्णय घेतले तर काहीही तुमच्या बरोबर नसणार.’
    आपल्या प्रश्नांची बुध्दिमत्तेने व चतुराईने दिलेली उत्तरे ऐकून अकबर खूप खुश झाला.

अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 4 - बिरबल सापडला - Birbal Sapadla


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 3 अकबर बादशहा आणि पोपट - Akbar Badshah Ani Popat


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 2  बिरबल काळा कसा झाला - Birbal Kara Kasa Jhala


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)