आज दिनांक २६ऑक्टोबर २०२१ ,मंगळवार
👧👦 जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा ,केंद्र :-सावटे ,ता.डहाणू येथे वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्ट ,तारापूर यांच्या सौजन्याने
शाळेतील सर्व ११० विद्यार्थ्यांसाठी मास्क ,हॅन्डवॉश ,हॅन्डवॉश बॉटल ,थर्मल गन ,प्रत्येक विद्यार्थी 2 याप्रमाणे ऍक्टिव्हिटी नोटबुक ,स्मॉल नोटबुक अशा सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले.
🧴🧴🧴🧴📗📕📙📘
शाळाप्रमुख सौ.शिल्पा बळवंत वनमाळी मॅडम यांनी या कार्यक्रम प्रसंगी वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्टच्या
मुख्य ट्रस्टी आदरणीय डॉक्टर सौ. सुजला
पाठारे ( शास्त्रज्ञ) व वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्ट प्रोजेक्ट इंचार्ज सौ. रागिनी पाटील ,श्रीम .प्रीती करमोड ,श्रीम.दर्शन हेंगाडी यांचे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले .💐💐💐💐
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना डाॕक्टर सुजला पाठारे मॕडम यांनी कोविड काळात कोणती काळजी घेणे अजूनही गरजेचे आहे याबद्दल उत्तम असे मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांनी जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा शाळेत सुरू असणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची शाळेची यशोगाथा पाहून ,
"असेच चांगले काम करत राहा ,आपली नाळ जुळलीय, हे नातं असंच वाढवूया "
या शब्दात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
पाहुण्यांनी संपूर्ण शाळेचा परिसर पाहून पुढील काळात शाळेत परसबाग उपक्रम राबवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले .
शाळेचे उपशिक्षक श्री. नागनाथ भोसले सर आणि श्रीम.अंसू सिंह मॅडम यांनी मान्यवरांचे आभार मानले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏