महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग च्या शासन निर्णय क्र. शिदीअ-२०२१/प्र.क्र. १२१/एसडी- ६
दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ अन्वये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भारोळ, केंद्र-खानिवडे, तालुका-वसई, जिल्हा पालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन शिक्षक कार्यगौरव सप्ताह साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकाांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात.
शासनाच्या निर्देशांनुसार दिनांक २ सप्टेंबर २०२१ ते दिनांक ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानाांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह भारोळ शाळेत साजरा करण्यात आला.
भारोळ शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंधलेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन केले गेले.
शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानाांतर्गत शिक्षकांच्या कार्यगौरव प्रित्यर्थ खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१. इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी
1. वक्तृत्व, 2. चित्र रेखाटन, 3. काव्य वाचन, 4. निबंध.
विषय - 1. माझा आवडता शिक्षक, 2. शिक्षक दिन, 3. मी शिक्षक झालो तर / मी शिक्षिका झाले तर.
२) इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी
1. निबंध लेखन, 2. वक्तृत्व, 3. स्वरचित कविता लेखन, 4. काव्यवाचन
विषय - १. माझा शिक्षक माझा प्रेरक, २. कोव्हिड कालावधीतील शिक्षकांची भूमिका, ३. माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान, ४. उपक्रमशील शिक्षक.
३) इयत्ता नववी ते इयत्ता दहावी
1. निबध लेखन, 2. वक्तृत्व, 3. शिक्षकांची मुलाखत, 4. काव्य लेखन, 5. काव्य वाचन.
विषय - 1. आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका, 2. देशाच्या जडण घडणीमध्ये
शिक्षकांचे योगदान, 3. शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम, 4. माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम.
उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर Facebook- @thxteacher, Twitter-@thxteacher, Instagram-@thankuteacher अशा प्रकारे टॅग करुन अपलोड केले गेले.
यावेळी
#ThankATeacher
#ThankYouTeacher
#MyFavouriteTeacher
#MyTeacherMyHero
#ThankATeacher2021
या हॕशटॕग (#) चा वापर करण्यात आला व SCERT च्या पोर्टल वर नोंदणी करण्यात आली.
सदर राज्यस्तरीय उपक्रमात हर्षला संकेत सुतार 8017462, प्रथमेश राजेश शिंगरे 8017940, रुपेश संतोष कोम 8018067, ऋषिकेश रविंद्र कडव 8018204, हर्षला लखमा कडव 8019462, रोहित अंकुश म्हसे 8019896, मयुरेश गणेश कडव 8020161, रुचिता दिनेश कडव 8020964, रसिका रामा कवळी 8017795, जया रमेश बेंदर 8021740, दर्शिल संकेत सुतार 8021459, सावली पंढरी काटेला 8021282, पल्लवी देवकर कडव 8021885, अमोल अशोक गोवारी 8021206, दर्शिल संकेत सुतार 8022010, प्रिती दामा कडव 8021065, अनिता संतोष कडव 8021851, चांदणी काशिनाथ बोंगे 8022031, प्रिती दामा कडव 8021553, प्रतिभा प्रभाकर गोवारी 8019771, राहूल राजेश कडव 8020002, रोहित पंढरी काटेला 8020254, नितिन बबन काटेला 8020601, अस्मिता रामा जोशी 8020445, रुचिता सदानंद सिताड 8020755 व संजना नवशा कडव 8020906 हे विद्यार्थी सहभागी झाल्याचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक व उपक्रमाबाबतची online प्रक्रिया करणारे श्री मनोज राऊत ह्यांनी सांगितले.
शाळेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना श्रीमती रजनी कुडू, श्रीमती निलोफर रायली, श्री जयराम बोंगे, श्रीमती मारीया डिकाॕस्टा, श्रीमती नितिजा म्हात्रे, श्रीमती सविता घोन्सालविस व श्रीमती अनिता डिसिल्व्हा ह्यांनी मार्गदर्शन केले.