NDA परीक्षेचा पॅटर्न बदलणार ??? सैन्यात जाण्याचे ध्येय बाळगणाऱ्या भावी सैंनिकांसाठी …

Rajan garud
0


 भारतीय सैन्यात जाण्याचे ध्येय बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा (NDA Exam) महत्वाची असते.

पालघर :  दरवर्षी संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC) दरवर्षी नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) परीक्षेचे आयोजन केले जाते. भारतीय सैन्यात जाण्याचे ध्येय बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा (NDA Exam) महत्वाची असते. परंतू, यंदा होणाऱ्या परीक्षेत आयोगाकडून काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढलेली आहे.
यावर्षी युपीएससीमार्फत 14 नोव्हेंबरला NDA Exam 2021ची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आयोगाकडून 9 ते 29 जूनदरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. यंदा होणारी एनडीएची परीक्षा गेल्या वेळीच्या परीक्षेपेक्षा कशी वेगळी असेल? याबाबत उत्सुकता आणि प्रश्न पडले आहेत. मात्र आता या बदलाबाबत आयोगाकडून माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी यंदाची परीक्षा खास असणार आहे. कारण आता National Defense Academy (NDA) आणि  NA या परीक्षा महिला देखील देवू शकणार असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने देखील याबाद्दल घोषणा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते की या निर्णयानंतर परीक्षेवर काही परीणाम होईल का? मात्र याचाही खुलासा केंद्र शासनाने केला आहे. सध्या विद्यार्थ्यांनी या NDA च्या परीक्षेबद्दल काळजी करण्यासारखं काहीच नाही.
यावर्षी घेण्यात येणारी परीक्षा आहे तशीच असणार आहे. यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र पुढील वर्षी गरजेनुसार या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो, असं केंद्र सरकारकडून कोर्टाला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)