महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटीईटी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं आयोजन 30 ऑक्टोबरला करण्यात येणार होतं.
प्रवेशपत्र या तारखेपासून मिळणार
30 ऑक्टोबरला घेण्यात येणारी टीईटी परीक्षा लांबणीवर टाकली गेली आहे. आता 21 नोव्हेंबरला परीक्षा होणार असल्यानं प्रवेशपत्र देखील आता उशिरानं मिळणार आहेत. 26 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान प्रवेशपत्र मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
टीईटी परीक्षेचे दोन पेपर
साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर
प्रवेशपत्र कुठे मिळणार?
टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
टीईटी परीक्षेचं वेळापत्रक
पात्रता
टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
पेपर 1 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.
पेपर क्रमांक 2 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी. इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.
टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.
TET बद्दल अधिक जाणून घ्या 👉👉
नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खास सरावासाठी खालील ऑनलाइन टेस्ट तयार केलेल्याआहेत.
सर्वांनी खालील चित्राला क्लिक करून अधिकाधिक सराव करा. एकदा चुकले असता पुन्हा पन्हा सराव करा.
वर्गीकरण=- आकृत्या भाग 2 ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
वर्गीकरण ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
वर्गीकरण=- आकृत्या ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
वर्गीकरण - संख्या 2 ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
वर्गीकरण - शब्दसंग्रह भाग २ ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
क्रम ओळखणे ( संख्यामालिका ) ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
क्रम ओळखणे भाग 2 ( संख्यामालिका ) ऑनलाइन टेस्ट - शिष्यवृत्ती परीक्षा
शैक्षणिक विडियो पहा.
घटकाचे नाव |
Video link |
भागाकार - भाग १ |
|
भागाकार - भाग २ |
|
भागाकार - भाग ३ |
|
भागाकार - भाग ४ |
|
भागाकार - भाग ५ |
|
भागाकार - भाग ६ |
अधिक शैक्षणिक video पाहा.