खेळांचे विविध प्रकार तुम्हाला माहिती आहेत का ??? चला जाणून घेऊया.

Rajan garud
0

 

खेळांचे विविध प्रकार




  • अर्जुन पुरस्कार 
  • विविध प्रकारच्या खेळांत व क्रीडांत प्रतिवर्षी सर्वोकृष्ट ठरणाऱ्‍या भारतीय खेळाडूंना व्यक्तिश: देण्यातयेणारा राष्ट्रीय पुरस्कार

  • अर्वाचीन ऑलिंपिक सामने 
  • अर्वाचीन ऑलिंपिक सामने विषयक माहिती.

  • अश्वारोहण 
  • घोडा हाताळण्याची व स्वार होऊन चालविण्याची कला.

  • आंधळी कोशिंबीर 
  • एका खेळाडूने डोळे बांधून इतरांना शिवण्याचा लपंडावासारखा खेळ.

  • आट्यापाट्या 
  • स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ.

  • आशियाई क्रीडासामने 
  • आशियातील खेळाडूंसाठी सुरू झालेले आंतरराष्ट्रीय सामने.

  • उड्या व उड्यांचे खेळ 
  • उड्या व उड्यांचे खेळांविषयी माहिती.

  • ऑलिंपिक क्रीडा सामने 
  • आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने.

  • कबड्डी 
  • मैदाने : कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगणांची ३ गटात वर्गवारी केली जाते. पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३.०० मी. बाय १०.०० मी. , महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी. बाय ८.०० मी. तसेच किशोर व किशोरी गटाच्या मुलामुलींसाठी ११.०० मी. बाय ८.०० मी.

  • कवायती व संचलने 
  • कवायत म्हणजे सांघिक, शिस्तबद्ध शारीरिक हालचाल.

  • कसरतीचे खेळ 
  • कसरतीच्या खेळांचे प्रकार

  • कुत्र्यांच्या शर्यती 
  • ज्यात यांत्रिक सशाचा उपयोग केलेला आहे, असा वर्तुळाकार मैदानातील कुत्र्यांच्या शर्यतीचा लोकप्रिय पाश्चात्त्य खेळ.

  • कुस्ती 
  • कुस्ती हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते.

  • कूटप्रश्न (रिडल्स) 
  • कूटप्रश्न म्हणजे शब्दार्थाची चमत्कृती साधून तयार केलेले कोडे.

  • कॅरम 
  • भारतात जन्माला आलेला एक खेळ.

  • कॅरेट 
  • जपानी भाषेत कॅरेट म्हणजे मोकळे हात.

  • क्रिकेट 
  • क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली.

  • क्रोके 
  • लांब दांड्याच्या लाकडी मोगऱ्याने उभ्या ६ कड्यांतून चेंडू विशिष्ट प्रकारे पार करण्याचा खेळ.

  • खेळ 
  • मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा.

  • खो खो 
  • खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. ह्या खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.

  • गंजीफा 
  • पत्त्यांचा एक भारतीय खेळ.

  • गिर्यारोहण 
  • गिर्यारोहण : पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे.

  • गोल्फ 
  • चेंडू व काठी या साधनांनी १८ खळग्यांचा मार्ग व्यापणाऱ्या मोठ्या मैदानावर खेळावयाचा एक विदेशी खेळ.

  • घोड्यांच्या शर्यती 
  • घोड्यांच्या शर्यती जगभर रूढ असल्या, तरी इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांत त्या विशेष लोकप्रिय आहेत.

  • चालण्याची स्पर्धा 
  • लांब लांब पावले टाकीत, न पळता, जलद चालण्याची स्पर्धा.

  • जादूचे खेळ 
  • चमत्कृतिपणे खेळ.

  • जूदो 
  • निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वांवर आधारलेला कुस्तीसारखा जपानी खेळ.

  • टेनिस 
  • रबरी चेंडू व तातीने विणलेल्या रॅकेटने खेळावयाचा एक मैदानी खेळ.

  • टेबल-टेनिस 
  • एक लोकप्रिय, अंतर्गेही क्रीडाप्रकार.

  • द्वंद्व युद्ध 
  • दोन सशस्र माणसांतील पूर्वनियोजित युद्ध

  • नकला 
  • एक पारंपरिक रंजनप्रकार, नक्कल (मिमिक्री) म्हणजे अनुकरण-कला.

  • नेटबॉल 
  • चेंडू–खेळाचा एक प्रकार.

  • नेमबाजी (शूटिंग) 
  • बंदूक, पिस्तुल, रिव्हॉल्व्हर इ. साधानांनी स्थिर वा हलत्या निशाणावर नेम धरून गोळी मारण्याचा खेळ.

  • नौकाक्रीडा 
  • नौकांतून केलेला जलविहार तसेच विविध प्रकारच्या नौकास्पर्धा यांचा अंतर्भाव या क्रीडाप्रकारात होतो.

  • पटावरील खेळ 
  • पटावरील खेळ : (बोर्ड गेम्स). विविध आकार-प्रकारांच्या पटांवर सोंगट्या, फासे तसेच इतर साधनांनी खैळण्यात येणारे बैठे खेळ. प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत.

  • पट्ट्याचे हात 
  • पट्ट्याचे हात : (फेन्सिंग). तलवारीने खेळावयाच्या द्वंद्वांचे क्रीडाप्रकार. यात ‘फॉइल’, ‘एपी’ व ‘सेबर’ अशा तीन प्रकारच्या विशिष्ट टोकदार ð तलवारी वापरतात. हल्ला व प्रतिकार या दोन क्रिया या द्वंद्वात मह्त्त्वाच्या असतात.

  • पतंग 
  • पतंग हवेत उडवणे हा एक आकर्षक व मनोरंजक क्रीडाप्रकार.

  • पशुंच्या झुंजी 
  • प्राचीन काळापासून चालत आलेला एक रोमहर्षक लोकरंजनप्रकार.

  • पशुपक्षिशिक्षण 
  • पशूंच्या कौशल्याचे वा कसरतीचे वैशिष्ट्यपूर्ण खेळ.

  • पोकर 
  • पत्त्यांचा एक खेळ.

  • पोलो 
  • काठी आणि चेंडू या साधनांनी घोड्यावरून खेळावयाचा खेळ. हा अत्यंत प्राचीन खेळ असून, तो इराणमध्ये पहिल्या शतकात खेळला जात असावा, असे उपलब्ध पुराव्यावरून दिसते.

  • पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह 
  • टपालाच्या तिकिटांच्या व्यावहारिक उपयोगाव्यतिरिक्त, तिकिटे जमविण्याचा छंदही जगभर लोकप्रिय आहे.

  • पोहणे 
  • हातापायांच्या हालचालीने नैसर्गिक रीतीने पाण्यातून सरकण्याची क्रिया. हा एक अत्यंत लोकप्रिय असा, व्यायामदायक व रंजक क्रीडाप्रकार आहे. ज्या देशांना समुद्रसान्निध्य लाभलेले आहे, त्या देशांत पोहण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला जातो.

  • प्रतिभावान खेळाडू तयार करुया... 
  • जपान येथील टोकियो येथे सन 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राला जास्तीत जास्त पदके मिळविण्याच्या संदर्भात कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • प्राणायाम 
  • शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवून समाधीकरिता आवश्यक असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना.

  • प्रासंगिक खेळ 
  • विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने खेळले जाणारे खेळ.

  • फरीगदगा 
  • फरी व गदगा या ढालतलवारीसारख्या साधनांनी खेळावयाचा द्वंद्वात्मक खेळ.

  • फाळफेक (डार्ट्‌स) 
  • अचूक हात-फेकीच्या कौशल्यावर आधारलेला एक खेळ.

  • फाशांचे खेळ 
  • फाशांच्या साहाय्याने खेळावयाचे विविध खेळ.

  • फुगडी 
  • महाराष्ट्रातील मुली व स्त्रिया यांच्यात लोकप्रिय असलेला एक खेळ.

  • फुटबॉल 
  • फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : (१) असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि (२) रग्बी.

  • बर्फावरील खेळ 
  • बर्फावरून घसरत खेळावयाचे खेळ. त्यात स्केटिंग, स्कीइंग, टोबॉगनिंग, बॉब्‌स्लेडिंग, बर्फावरील हॉकी इ. खेळ मोडतात.

  • बहूरूपी खेळ 
  • अलीकडील काळात नव्यानेच रंगभूमीवर आलेला एक अभिनव नाट्यप्रयेग. हा प्रयोग प्रचलित नाट्यप्रयोगाहून वेगळ्या प्रकारचा असतो.

  • बालकन-जी-बारी 
  • मुलांसाठी कार्य करणारी भारतातील एक संस्था.

  • बालकांचे खेळ 
  • बालकाच्या मनावर खेळाची आवड कोणी बाहेरून लादलेली नसते; तर ती स्वयंस्फूर्तच असते.

  • बास्केट बॉल 
  • प्रत्येकी पाच खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जाणारा, मूळचा अंतर्गेही व नंतर मैदानी स्वरूपाचा एक खेळ.

  • बाहुली (डॉल) 
  • छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील, बालकांचे खेळणे.

  • बिझिक 
  • पत्त्यांचा एक खेळ.

  • बिल्यर्ड्‌झ 
  • बंदिस्त जागेत आयताकृती टेबलावर चेंडू व काठीने खेळावयाचे विदेशी क्रीडाप्रकार.

  • बुद्धिबळ 
  • बौद्धिक कौशल्यावर आधारलेला एक बैठा खेळ. चौसष्ट घरे (चौरस) असलेल्या पटावर प्रत्येकी सोळा सोंगट्या मांडून दोन खेळाडू तो खेळतात. बहुतेक खेळांत यश मिळविण्यामध्ये कौशल्याबरोबरच योगायोगाचाही भाग असतो

  • बॅडमिंटन 
  • रॅकेट व फूल (शट्लकॉक) यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक खेळ.

  • बेसबॉल 
  • प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये चेंडू व बॅट यांच्या साहाय्याने खेळला जाणारा एक मौदानी खेळ.

  • बैल झोंबी (बुल्‌फाइट) 
  • माणूस आणि बैल यांच्यातील झुंजीचा रोमहर्षक रंजनप्रकार.

  • बोटीवरील खेळ (डेक गेम्स) 
  • बोटीवरील प्रवासात मनोरंजनार्थ खेळले जाणारे विविध खेळ या गटात मोडतात.

  • बोथाटी 
  • मराठेशाहीतील एक मर्दानी खेळ.

  • बोलिंग 
  • एक अंतर्गेही क्रीडाप्रकार.

  • बोल्स 
  • एका विशिष्ट लक्ष्याच्या दिशेने चेंडू घरंगळत सोडण्याचा एक खेळ.

  • ब्रिज 
  • पत्त्यांचा एक लोकप्रिय खेळ.

  • भाबी आट्यापाट्या 
  • आट्यापाट्या खेळाचाच सोपा व सुटसुटीत प्रकार.

  • भेंड्या 
  • पाठांतराच्या आधारावर रचलेला एक करमणुकीचा खेळ.

  • भोवरा 
  • मुलांचा एक आवडता खेळ.

  • मनोरंजन 
  • मनोरंजन विषयक माहिती.

  • मल्लखांब 
  • वैशिष्ट्येपूर्ण महाराष्ट्रीय व्यायामप्रकार.

  • मुष्टियुद्ध 
  • मुष्टियुद्ध : एक रोमहर्षक क्रीडाप्रकार. पूर्वी हा खेळ नुसत्या मुठींनी खेळत, श्रीकृष्ण-कंस , भीम-दुःशासन इत्यादींच्या मुष्टियुद्धांचे संदर्भ महाभारत काळात आढळतात. प्राचीन ग्रीसमध्ये थीरा येथील भित्तिलेपचित्रात (इ. स. पू. १५२०) मुष्टियुद्धाचे चित्रण आढळते.

  • मॅराथॉन शर्यत 
  • धावण्याची, अतिलांब पल्ल्याची, आधुनिक शर्यत.

  • मॉजाँग 
  • एक चिनी खेळ, ‘मॉजाँग’ चा शब्दशः अर्थ चिमण्या.हा खेळ फार प्राचीन असून इ. स. पू. सु. ५०० पासून अस्तित्वात असावा.

  • मोटार शर्यती 
  • हमरस्त्यावरील किंवा आखीव मार्गावरील मोटारींच्या वेगवान शर्यती.

  • मोटारसायकल शर्यती 
  • मोटारसायकल या दुचाकी वाहनाच्या चित्तथरारक व साहसी शर्यतींचा प्रकार.हौशी व व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर या स्पर्धा होतात.

  • योगासने 
  • यातील मूळ शब्द योग व आसने.

  • रमी 
  • पत्त्यांच्या खेळाचा एक लोकप्रिय प्रकार.

  • रस्त्यावरील रंजनप्रकार 
  • रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून त्यांची औटघटका करमणूक करणारे खेळ.

  • रस्सीखेच 
  • एक क्रीडाप्रकार.

  • राष्ट्रकुल क्रीडासामने (कॉमनवेल्थ गेम्स) 
  • राष्ट्रकुल क्रीडासामने (कॉमनवेल्थ गेम्स) विषयक माहिती.

  • रिंग-टेनिस 
  • एक क्रीडाप्रकार.

  • रोमन ग्‍लॅडिएटर 
  • प्राचीन रोममध्ये द्वंद्वे खेळणाऱ्या योद्ध्यांना 'ग्‍लॅडिएटर' असे म्हणत.हे द्वंद्वांचे सामने प्रथम इ.स.पू. २६४ मध्ये रोममध्ये खेळले गेले.

  • लंगडी 
  • एक क्रीडाप्रकार.

  • लक्रॉस 
  • एक मैदानी खेळ.

  • लगो-या 
  • लगो-या लगो-या हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात.

  • लपंडाव 
  • लहान मुलांचा सुलभ, मनोरंजनात्मक खेळ.

  • लाठी 
  • एक व्यायामसाधन.स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून लाटी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला.

  • लेझीम 
  • क्रीडाप्रकार व साधन.

  • वजन उचलणे 
  • शरीरसौष्ठव व शक्तिवर्धन या उद्दिष्टांनी वजने उचलून करावयाचा विदेशी व्यायामप्रकार.

  • विंबल्डन 
  • लॉन टेनिसच्या स्पर्धासाठी जगप्रसिद्ध असलेले लंडनचे उपनगर.

  • विटी दांडू 
  • मुलांचा एक देशी खेळ.

  • व्यायामविद्या (जिम्नॅस्टिक्स) 
  • तंत्रशुद्ध व नियोजनबद्ध व्यायाम करण्याचे शास्त्र.

  • व्यायामशाळा (जिम्नेझिअम) 
  • व्यायाम करण्यासाठी खास सुविधा असलेल्या, तसेच अंतर्गेही खेळांसाठी पुरेशी जागा.

  • व्यायामी व मैदानी खेळ 
  • धावणे, चालणे, उड्यांचे प्रकार,फेकीचे प्रकार, अडथळ्यांच्या शर्यती इ. वैयक्तिक बळाने (काही अपवाद वगवाद वगळता) व तंत्राने खेळल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा समावेश सामान्यतः व्यायामी व मैदानी खेळांमध्ये होतो.

  • व्हॉलीबॉल 
  • उंच लावलेल्या जाळीवरून एक जाड चामड्याचा चेंडू हाताने टोलवायचा हा खेळ.

  • शब्दभ्रम कला (व्हेंट्रिलॉक्किझम) 
  • ध्वनी वा शब्द प्रत्यक्ष बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून न येता दुरून वा वेगळ्या ठिकाणाहून आल्याचा आभास निर्माण करणारी रंगमंचीय कला.

  • शरीरसौष्ठव स्पर्धा 
  • शरीरसौष्ठव म्हणजे मानवी शरीराचा सुडौल आणि सुबद्ध आकार.

  • शारीरिक शिक्षण 
  • क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षण.

  • शिकार - १ 
  • वन्य श्वापदे तसेच इतर पशुपक्षी यांचा पाठलाग करून त्यांना पकडणे, ठार मारणे अशा क्रियांचा समावेश असलेला एक साहसयुक्त खेळ.

  • शिकार - २ 
  • शिकारी मुळे वन्यजीवांना धोका.

  • शीड जहाज शर्यती 
  • छोट्या शिडांच्या क्रीडानौकांची शर्यत.

  • श्री शिवछत्रपति राज्य क्रीडा पुरस्कार 
  • क्रीडा- क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे पुरस्कार.

  • संगणक पोकर 
  • संगणकाच्या साहाय्याने खेळायचा एक खेळ.

  • सागरगोटे 
  • मुलींचा देशी खेळ. सागरगोटा (गजगा) हे एक काटेरी झाड आहे. त्याला काटेरी शेंगा येतात, त्या शेंगांच्या आतील बिया म्हणजेच सागरगोटे होत.

  • साठमारी 
  • देशी मर्दानी खेळाचा एक प्रकार.

  • सायकल शर्यती 
  • सायकल शर्यती विषयक माहिती.

  • सूर्यनमस्कार 
  • व्यायामाचा आणि उपासनेचा एक प्रकार.

  • सॉफ्टबॉल 
  • मैदानी सांघिक खेळाचा एक प्रकार.

  • सोंगट्यांचा खेळ 
  • सोंगट्या, पट व फासे किंवा कवड्या यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक जुना बैठा खेळ.

  • सौंदर्यस्पर्धा (ब्यूटी कॉन्टेस्ट/पॅजन्ट) 
  • स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा.

  • स्केटिंग 
  • एक कसरतीचा खेळ. आधुनिक काळात तो एक स्पर्धात्मक खेळ व करमणुकीचे एक साधन म्हणूनआनंददायी छंद बनला आहे.

  • हँग ग्लायडिंग 
  • एक हवाई खेळ.

  • हँडबॉल 
  • एक सांघिक खेळ.

  • हवाई खेळ व शर्यती 
  • अंतराळातील क्रीडाप्रकार. हवेत तरंगण्याच्या हौसेलाच स्पर्धात्मक वळण लागले आणि हवाई खेळ व शर्यतींनी क्रीडाक्षेत्राला एक नवा चेहरा दिला.

  • हॉकी 
  • हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो.


    माहितीस्त्रोत : विकासपेडिया

    टिप्पणी पोस्ट करा

    0टिप्पण्या

    टिप्पणी पोस्ट करा (0)