जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा शाळेच्या नवीन वर्गखोली इमारतीचा उदघाटन सोहळा संपन्न
आज दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी, डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगवन नवासाखरा ,केंद्र सावटे ,ता .डहाणू ,जि .पालघर येथे डॉ. केरोपंत आर. माजगांवकर ट्रस्ट, मुंबई यांच्या सौजन्याने नव्याने बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोली इमारतीचा उदघाटन सोहळा कोविड संदर्भातील नियमांचे पालन करून पार पडला.
इयत्ता १ली ते ५वी चे वर्ग व जवळपास ११० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या आगवन नवासाखरा शाळेस वर्गखोलीची कमतरता जाणवत होती ही बाब यापूर्वी शालोपयोगी साहित्य वाटप करण्यासाठी आलेल्या डॉ. केरोपंत आर. माजगांवकर ट्रस्टच्या ,ट्रस्टीच्या निदर्शनास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .शिल्पा वनमाळी यांनी आणून दिली होती व त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती.
ती विनंती लक्षात ठेवून ट्रस्टच्या विश्वस्थानी सदर शाळेस दोन वर्गखोल्यांची अतिशय आकर्षक इमारत मंजूर करून बांधली आणि आज उदघाटन प्रसंगी शाळेस वर्ग केली...
सदर वर्गखोली इमारतीचे उदघाटन ट्रस्टचे विश्वस्त श्री. अजित करंदीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सावटे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .महेश वर्तक सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मदन बालशी, उपाध्यक्ष श्रीम. वनशी तल्हा, शिक्षणप्रेमी श्री. रुपजी सुतार, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज मोरे सर , श्री. बळवंत वनमाळी सर ,श्री .राम पिंपळकर सर , शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, आगवन नवासाखरा येथील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा वनमाळी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. नागनाथ भोसले सर यांनी तर आभारप्रदर्शन श्रीम. अंसू सिंह मॅडम यांनी केले