पालघर वसई मधील ध्येयवेड्या ऋग्वेदने साकारली इको इलेक्ट्रिक बाइक, जी ठरतेय आकर्षणाचे केंद्रबिंदू

Rajan garud
0

 Lockdown म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अंधार म्हणायला हरकत नाही परंतु हेच lockdown स्वतःच्या यशाची शिखरे चढण्यासाठी वेळेचा सदुपयोग करत एका  तरुण ध्येयवेड्या  संशोधकाने  प्रत्यक्ष घरीच बनविली  इको इलेक्ट्रिक बाईक   !



                                        







कु.ऋग्वेद महेश सूर्यवंशी हा विराट नगर विरार येथे राहत असून मालाड येथील अथर्व इंजिनियर कॉलेज मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन या शाखेत शिकत आहे.त्याला लहानपणापासूनच काहीतरी नवीन क्रिएशन बनवण्याची आवड होती आणि तेव्हापासूनच  त्याला गाड्यांमध्येही आवड निर्माण झाली होती व त्यातूनच इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड असल्याने त्याने इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचे ठरवले व कोरोना काळात lockdown चा मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याने त्याच्या स्वप्न पूर्तीला सुरुवात केली. योगायोगाने मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाइकला वाव मिळेल या हेतूने निर्णय ठाम झाला व त्याने रिसर्च करायला सुरुवात केली. सुरुवातीचे दोन महिने मित्रांबरोबर चर्चा करून गाडीचे डिझाईन काय असेल ?  सामान कुठे मिळेल? काय काय सामान लागेल ?  त्याची जुळवाजुळव केली. Lockdown मध्ये मिळालेल्या वर्षभरात गाडी बनवता बनवताच  त्यासाठी आवश्यक असलेले कटिंग, मोल्डिंग, ग्राइंडिंग, ड्रिलिंग, वेल्डिंग अँड पेंटिंग हे स्वतः शिकला. विरार वसईतील लोकांशी मैत्री करून त्यांच्याकडील टाकाऊतून टिकाऊ मिळणाऱ्या  वस्तूतून शेवटी त्याने डिझाईन केलेली इलेक्ट्रिक  बाइक बघता बघता  साकार झाली. जी आज एका चार्जिंग वर 65 ते 70 च्या स्पीडने शंभर किलोमीटर धावू शकते व त्यासाठी  एका चार्जिंगला 20 ते 22 रुपये इतका खर्च येतो. इलेक्ट्रिकल बाईक मध्ये आर्टिफिशियल इंटिलीजन्स ऍड करायचे त्याचे लक्ष आहे व त्यासाठी त्याला त्याच्या आई-वडिलांची प्रोत्साहन व मदत मिळत आहे असे तो आवर्जून सांगतो.भविष्यात वाढत्या पेट्रोल व डिझेल साठी पर्याय म्हणून ही  इलेक्ट्रिक बाईक नक्कीच उपयोगात येणार असेही त्याचा पूर्णपणे दावा आहे. कुटुंबातील व्यक्ती,मित्र आणि सोशल मीडिया तुन कौतुकाची थाप ऋग्वेद ला मिळत आहे.





" लहानपणापासूनच ऋग्वेदला सतत काहीतरी नवीन करण्याची आवड होती. ती फक्त जोपासण्यासाठी आम्ही घरातील सर्वानी नेहमी त्याला प्रोत्साहन दिले. त्यातून त्याने इलेक्ट्रिक बाइक बनवली, ह्यात मला खूपच आनंद आहे. त्यासाठी ऋग्वेद ने केलेले प्रयत्न व झोकून केलेले काम मी प्रत्यक्ष अनुभवले आहे यापुढे ऋग्वेद ने समाजासाठी काही नवीन निर्माण करावे असे मला वाटते."

सौ.रुचिता सूर्यवंशी 
आदर्श शिक्षिका जि.प.नेहरु हिंदी विद्यालय विरार ता.वसई जि.पालघर

           Follow 👉 @batteries_and_brainzz




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)