आदिवासी सेवक कै. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ राज्य शिक्षक पुरस्काराची घोषणा
आदिवासी सेवक कै. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ राज्य शिक्षक पुरस्काराची घोषणा
आदिवासीसेवक या राज्यपुरस्काराने सन्मानित , कामगारांच्या न्यायासाठी मोठे योगदान दिलेले,मराठी शाळेतील मुलांना मदत करून मराठी शाळांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले, तसेच पत्रकार असलेले स्व.अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी शाळा संस्थाचालक संघ यांच्या वतीने राज्य शिक्षक पुरस्काराची घोषणा आजच्या शिक्षक दिनी करीत असल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी दिली.
राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठीच हा पुरस्कार देण्यात येणार असून ७७७७ रू., सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे त्याचे स्वरूप असणार आहे. कै.अशोक नाना चुरी स्मृती राज्य शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेत इ. १ ली ते इ.१० वी पर्यंत अध्यापनाचे काम करणारे शिक्षक/शिक्षिका आपला प्रस्ताव पाठवू शकतात.
कै.अशोक चुरी यांच्या पत्नी श्रीमती अनिता चुरी यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा राज्य शिक्षक पुरस्कार आम्हा कुटुंबासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून हा पुरस्कार त्यांच्या कामाला उजाळा देणारा तर ठरेलच परंतु शिक्षकांसाठी सुद्धा हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त केली.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ राज्य शिक्षक पुरस्कार देणे हे आमच्यासाठी गौरवास्पद असून सदर पुरस्कारासाठी २५ अॉक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शिक्षकांना करीत असल्याची माहिती मराठी शाळा संस्थाचालक संघाचे व या पुरस्कार समितीचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी दिली.
प्रस्ताव लिंक 👇👇👇👇👇
मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी शाळा संस्थाचालक संघाचा आदिवासी सेवक कै.अशोक नाना चुरी राज्य शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याची लिंक.
प्रस्ताव पाठवण्यासाठी संपर्क -
सुशिल शेजुळे - ९६०४५२३६६६