बातमी आनंदाची चला ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत.

Rajan garud
0
 शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इ .८ वी ते १२ वी च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी अतिरीक्त मार्गदर्शक सुचना .






गरुडझेप : कोरोनामुळे (corona) मागच्या बऱ्याच महिन्यापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा (school) आता सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु होणार आहेत. येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होतील. शिक्षण विभागाने (school dept) मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेला प्रस्ताव मंजुर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.



या पद्धतीने होतील शाळा सुरु

  • ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होणार

  • मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्स, शिक्षणतज्ज्ञांशी बोलून एसओपीसंदर्भात चर्चा झाली

  • विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी एसओपी जाहीर

  • विद्यार्थ्यांकडे कसे लक्ष दिलं पाहिजे, याबाबत पालकांसाठी सूचना आहेत.

  • शाळेतून आल्यावर अंघोळ, युनिफॉर्म धुणे, मास्कचा नियमित वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन याबाबत एसओपी असतील.

  • शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी असणार नाहीये

  • शाळांमध्ये उपस्थितीची सक्ती नाही

  • उपस्थितीसाठी पालकांची संमती असणं गरजेचं आहे

  • प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी कसं जोडता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत

  • सध्या निवासी शाळांसंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाहीये

  • शाळेत येताना यायची काळजी, शिक्षकांचं लसीकरण याबाबत पेडीयाट्रीक टास्कफोर्सशी चर्चा झाली आहे.

  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याबाबत प्राधान्य आहे

  • विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच शाळा सुरु होतील. आठ दिवस तयारीसाठी मिळावेत म्हणून आज आम्ही घोषणा करत आहोत.

  • विद्यार्थ्यांना उलट्या,जुलाब,ताप, पोटदुखी असेल तर पालकांना,शिक्षक यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील..

  • ज्या शाळा कोविड सेन्टर म्हणून वापरल्या त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे...

  • कोरोना काळात किती विद्यार्थी शाळाबाह्य झाली याची तपासणी सुरू आहे

  • शिक्षकांना टास्क फार्स ने दिलेल्या सुचनांबाबत ट्रेनिंग दिले जाईल.


अधिक शैक्षणिक video पाहा.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)